महाराष्ट्र वेदभुमी

श्री चंडिका मंदिर सामाजिक सभागृहासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

 


नंदिनी भोसले  प्रतिनिधी तळा 

आ.भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर त्यातील ३० लक्ष रुपयांची पहिली प्रमा प्रसिद्ध

तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका मंदिर येथे सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी आ.भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील ३० लक्ष रुपयांची पहिली प्रमा प्रसिद्ध करण्यात आली आहे...

पौष पौर्णिमा कार्यक्रमासाठी ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात दर्शनासाठी आले होते..आ भरत गोगावले 

आ.भरत गोगावले हे पौष पौर्णिमा कार्यक्रमासाठी ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात दर्शनासाठी आले होते.. तळा शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती...त्यावर क्षणाचाही विलंब न करता आ.भरत गोगावले यांनी निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बारा वाड्यातील ग्रामस्थांना दिले होते... 

लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याची शिवसेना शिंदेगटाचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी दिली माहिती

आश्वासनाची पूर्तता करीत आ. भरत गोगावले यांनीं श्री चंडिका मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती  शिवसेना शिंदेगटाचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post