महाराष्ट्र वेदभुमी

कोमसाप रोहा शाखेची वर्षा सहल बिरवाडी किल्ल्यावर, वेगळी अनुभूती



श्याम लोखंडे प्रतिनिधी कोलाड 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत बिरवाडी किल्ला... भवानीगडाच्या चढाईला केली सुरुवात

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अग्रेसर कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची वर्षा सहल चणेरा विभागातील बिरवाडी गडावर रविवारी वेगळ्या अनुभूतीत अधोरेखित झाली आहे... प्रारंभी गडपायथ्याशी असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेत . मंदिरातच गडकिल्ले अभ्यासक व इये देशीचे दुर्ग या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांच्या पुस्तकातील बिरवाडी किल्याच्या वर्णनावरील उतारा स्वराज दिवकर याने वाचून दाखवला....नंतर छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून बिरवाडी किल्ला भवानीगडाच्या चढाईला सुरुवात केली...

बिरवाडी गावचे रहिवासी प्राथमिक शिक्षक भरत मुंगळे सोबत सुखद राणे यांचे माहितीवजा मार्गदर्शन

सोबत असलेले बिरवाडी गावचे रहिवासी प्राथमिक शिक्षक भरत मुंगळे सोबत सुखद राणे यांचे माहितीवजा मार्गदर्शन आणि पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या "जय भवानी जय शिवराय" अशा घोषणांनी बिरवाडी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला... त्यामुळे किल्ला पाहाताना एक ऊर्जा आली...

१६५७ ते १६६१या काळात परिसराच्या संरक्षणासाठी  छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला बिरवाडी किल्ला 

१६५७ ते १६६१या काळात परिसराच्या संरक्षणासाठी तसेच चौल रेवदंडा व अवचितगड रोहा या कुंडलिका नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या काळी नावाजलेल्या चणेरा बाजारपेठेच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बिरवाडी किल्ला बांधून घेतला....एकतर अधिक श्रावणातील दिवसमध्ये सोनेरी उन व रिमझिम पाऊस यांच्या  जुगलबंदीत हिरव्यागार रानातील ही हिरवी गडचढाईची पायवाट तुडवत बिरवाडी गडाचे दर्शन घेतले...

कोमसाप शाखेच्या अध्यक्षा संध्या दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन 

खांबेरे या छोट्याशा गावातील कोमसाप सदस्य गणेश भगत यांच्या लक्ष्मी अग्रो फार्म हाऊसवर दुपारचे भोजन केले..त्याठिकाणी कोमसाप शाखेच्या अध्यक्षा संध्या दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.. गणेश भगत हे कोकण आयडॉल हा पुरस्कार प्राप्त शेतकरी असल्याने त्यांचे कोमसाप रोहा शाखेच्यावतीने शाल अभिनंदन केले... सहल व कविसंमेलनासाठी शाखेचे सचिव विजय दिवकर यांनी उत्तम नियोजन केले... संध्या दिवकर, सुखद राणे ,रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ पत्रकार दिलीप वडके, विजय दिवकर, कवी हणमंत शिंदे, गणेश भगत, नारायण पानवकर, शरद कदम,भरत चौधरी, नेहल प्रधान, स्वराज दिवकर, तसेच खांबेरे गावचे रहिवासी माजी पोलीस पाटील खेळू शिंदे, बाळाराम पडवळ, चंद्रकांत शिंदे यांनी सुद्धा या कविसंमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला... या संमेलनात हणमंत शिंदे यांची आदिवासी भाषेतील कविता , संध्या दिवकर यांची आगरी कविता- शिमीटचे जंगलान ,राजेंद्र जाधव यांची केली पुढाऱ्यानी देशावर सत्ता या कवितांना विशेष दाद मिळाली... संध्या दिवकर व विजय दिवकर यांनी ठेक्यात सादर केलेली संध्या दिवकर यांची 'आला पाऊस माझ्या अंगणात' या कवितेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...सुखद राणे, दिलीप वडके, गणेश भगत मनोगत व्यक्त केले..आभार प्रदर्शन गणेश भगत यांनी केले...


Post a Comment

Previous Post Next Post