नवी मुंबई प्रतिनिधी जान्हवी भोईर
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत आमदार गणेश नाईक भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये बाईक तिरंगा रॅली काढण्यात आली... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे..
दिघा येथून ऐरोली,रबाळे,घणसोली,कोपरखैरणे ,जुईनगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे समारोह
दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी नऊ तीस वाजता ही रॅली काढण्यात आली... या रॅलीच्या माध्यमातून नवी मुंबई ऐरोली मतदारसंघातून दिघा येथून ऐरोली,रबाळे,घणसोली,कोपरखैरणे ,जुईनगर या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी या रॅलीचा समारोह करण्यात आला..
देशभक्तीची एक लाट उसळली लाट
या रॅलीमुळे नवी मुंबईत देशभक्तीची एक लाट उसळताना दिसली.. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने ही मोहीम मोठ्या दिमाखात साजरी केली... आमदार गणेश नाईक व भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक तसेच माजी संसद डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक तसेच भाजपचे माजी नगरसेवक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

