कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
मनमानी कारभारावरून संतप्त ग्रामस्थांनी कारवाही करण्याची केली मागणी...
रोहा तालुक्यात नामवंत तसेच भोंगळ कारभारात चर्चेत व लाखोंची उलाढाल असलेल्या खांब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आता नागरिकांना पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला...स्थानिक पुढारी ठेक्यासाठी कोणालाही न जुमानता एका पाठोपाठ एक शासकीय जुनी इमारतीवरच हातोडा मारत ग्रामपंचायत आवारातील गट क्रमांक ११ या जागेत रायगड जिल्हा परिषद अखत्यारीत राष्ट्रीय विस्तार योजनेंतर्गत (सन १९७८) साली पक्के बांधकाम करून ही शाळा उभारली... त्यावर शासकीय कोणतीच परवानगी न घेता दुसऱ्या ठेक्यासाठी इमारत तोडण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावरून संतप्त ग्रामस्थांनी कारवाही करण्याची केली मागणी...
विकास कामे मनमानी तसेच काम चलाव पद्धतीने केली जात असल्याची नेहमीच चर्चा
अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या विकास कामे मनमानी तसेच काम चलाव पद्धतीने केली जात असल्याची चर्चाची नेहमीच बोंब आहे...त्यामुळे ठेका घेण्याच्या वेळेला शासकिय इमारत एक पाडायची आणि त्या जागेवर दुसरी इमारत उभी करायची...सदरच्या जागेत असलेल्या इमारतीत ग्राम कॉटर्स, तद्नंतर भाजी मार्केट,विकासाचे नाव आणि ठेक्याचा अठ्ठहास हाच कारभार सदरच्या ग्राम पंचायतमध्ये सुरू असून हद्दीत असलेल्या ठेक्यासाठी इमारतीच गायब करणे हे बलाढ्य ग्रामपंचायतीला काही नव्यानं नसल्याचे बोलले जातय...राजकीय वर्तुळात स्थानीक पुढाऱ्यांचा हम करो सो कायदा त्यामुळे कामाचा ठराव असला काय आणि नसला काय ही भूमिका कायम.. याबाबत संबधित अधिकारी वर्गाकडे स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी अनेकदा तक्रार केली..त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जातय ...आजपर्यंत चौकशी अधिकारी चौकशीच करताहेत...
तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतमध्ये हाच घडला होता प्रकार
तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी,या ग्राम पंचायतमध्ये हाच प्रकार घडला होता.. या पंचायतमध्ये कोणताही ठराव अथवा परवानगी न घेता येथील ग्रामपंचायतीची जुनी इमारत तत्कालीन सरपंच यांनी पाडली होती...तर काम न करताच सदरच्या नव्या ठेकेचे बिल लाटले...असे समजताच चक्क त्यावर वेळीच विरोधक तसेच चिल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत संबधित अधिकारी वर्गाकडे तक्रार केली...त्यावर नेमलेले चौकशी अधिकारी यांची चालढकल, झुलवा झुलव अखेर सर्वच स्थरावर चौकशीची मागणी होताच सदरच्या प्रशासनाला जाग आली...आणि त्याची चौकशी करत सरपंच यांना दोषी ठरवत पदच रद्द करण्यात आले... अद्याप अपहार केल्याची वसुली बाकी असल्याचे बोलले जातय...
ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११ मधील जमीन ही मुंबई गोवा महामार्गाच्या कामात गेली आहे.. तर त्याचा मोबदला महसूल गुलदस्त्यातच असल्याचे बोलले जात आहे... वरील विषयांतार्गत याची माहिती घेण्यासाठी येथील ग्रामसेवक पातेरे यांना संपर्क साधला परंतु तो झाला नसल्याने याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही..
प्रतिक्रिया:एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे.. सदरच्या कामाबाबत ग्रामस्थांनी संबधित अधिकारी वर्गाकडे लेखी तक्रारी अर्ज केल्यानंतर सदरच्या कामाला वरीष्ठ पातळीवरून स्थगिती देण्यात आली आहे.. तसेच या कामाबाबत परवानगी अथवा ठराव मंजूर करून घेतला की नाही याची चौकशी सुरू असल्याचे सरपंच सौ कांचन मोहिते यांनी सांगितले...
प्रतीक्रिया :खांब येथील गट नंबर ११ सदरच्या जागेत राजिप ची जुनी शाळा इमारत होती... ती येथील ग्रामपंचायत पदावर असलेल्या पदाधिकार्यानी कोणताही प्रकारचा ठराव नसताना जुनी इमारत तोडण्यात आली...ही राष्ट्रीय विस्तार योजने अंतर्गत जुनी इमारत बांधण्यात आली होती... ठेक्यासाठी शासकीय इमारतीच गायब करत आल्याने या गोष्टीची खांब ग्रामस्थांनी १३ मार्च २०२३ रोजी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद,मा. जिल्हाशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करूनसुद्धा ग्रामस्थानच्या अर्जाची दखल घेतली नाही...हा विषय शिक्षण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दरबारी नेणार असल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.. लेखी तक्रारी अर्ज संबंधित अधिकारी वर्गाकडे केली असून याबाबतची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे...दिलीप लाडगे सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया दिली..
