महाराष्ट्र वेदभुमी

रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस २१ ऑगस्टपर्यंत प्रथम मुदतवाढ

 


रायगड(जिमाका)

दि.१४ :- सन २०२३-२०२४ साठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी)  कुंडलिका नदी,रेवदंडा खाडी व तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी, राजपूर खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रिया दिनांक २८ जून ते ५ ऑगस्ट या कालावधीसाठी राबविण्यांत आली होती... त्यापैकी  प्ररिशिष्ट १ मधील डेपो क्रमांक २, ८ व ९ करिता प्रत्येकी तीन निविदा प्राप्त झाल्याने ते वगळून शिल्लक असलेल्या वाळू डेपो क्रमांक १, ३, ४, ५, ६,७ या फेर निविदेसाठी प्रथम  फेर निविदा प्रक्रियेस दि.१४ ऑगस्ट ते दि.२१ ऑगस्ट  या कालावधीसाठी द्वितीय  मुदतवाढ देण्यांत येत आहे...

सविस्तर माहिती बद्दल.कळविले जिल्हा खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांनी 

 या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गटांचा- डेपोचा तपशिल, आणि गाळ अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती माहिती https://mahatenders.gov.inतसेच www.raigad.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करुन देण्यात आली आहे... असे जिल्हा खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांनी कळविले आहे...


Post a Comment

Previous Post Next Post