महाराष्ट्र वेदभुमी

पेण तालुक्यातील भालगाव येथे खारलँड बंदीस्थीच्याक कामात १०० कोटीचा घोटाळा..संजय तन्ना


 

पेण वृत्त/ शहानवाज मुकादम 

नियोजनासाठी ४० कोटी खर्च असलेला निवेदा  नेमलेल्या ठेकेदाराने वाढीव अतिरिक्त खर्च म्हणून १०० कोटी केले मंजूर.

भाल ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी नदी खाडीच्या  पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून त्या ठिकाणी बंदिस्थी करत सुरक्षित अशा नियोजनासाठी ४० कोटी खर्च असलेला निवेदा  नेमलेल्या ठेकेदाराने वाढीव अतिरिक्त खर्च म्हणून १०० कोटी मंजूर केला...

भ्रष्टाचार झाल्याचे आरोप मनसे रायगड जिल्हा रस्ते अस्थापना विभाग संघटक संजय तन्ना यांनी केले

भालगावमध्ये नदी खाडीच्या पुराचे पाणी परत  पंधरा दिवसापूर्वी गावात शिरल्याने  मनसे सैनिकांनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता  मंजूर ६५ कोटी रक्कमेतुन ५ कोटींच पण काम झालेले दिसत नसल्याने  बंदिस्थीच्या कामात मोठा  भ्रष्टाचार झाल्याचे आरोप मनसे  रायगड जिल्हा रस्ते अस्थापना विभाग  संघटक संजय तन्ना यांनी केले आहे...मनसे तर्फे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडे या आरोपाबाबतीत सखोल चौकशी व्हावी यासाठी कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे ...

गंभीर भ्रष्टाचाराबद्दल दखल न घेतल्यास  महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाहीच्या माध्यमातून उभारेल जनआंदोलन 

तक्रारीनंतर याठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सब कॉन्टॅक्टर काम करत असून कामाच्या दर्जेच्या व कामगाराच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची कायदेशीर  बाब पाळली जात नसल्याचे जिल्हा रस्ते अस्थापना विभाग उपसंघटक रमेश पाटील यांना पाहायला मिळाले.शासनाने या गंभीर भ्रष्टाचाराबद्दल दखल न घेतल्यास  महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाहीच्या  माध्यमातून जन आंदोलन उभारेल असे संजय तन्ना यांनी प्रसार माध्यमांना कळवले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post