कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे
शिवविचार जनमानसात रुजवण्याचा शिवशंभु प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पदच
शिवविचारांचा वारसा घेऊन गड संवर्धनात कार्यरत असलेल्या रोहा तालुक्यातील शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने चणेरा येथील द.ग.तटकरे सारसोली येथील कनिष्ठ महाविद्यायात वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम नुकताच मोठया उत्साहात पार पडला...गड संवर्धनाच्या सोबतच शिवविचार जनमानसात रुजवण्याचा शिवशंभु प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पदच असल्याने ही वकृत्व स्पर्धा थोर युग पुरुषांच्या विचारांतून मोठ्या उत्साहात संपन्न झाली...
सहभागी स्पर्धकांना शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने प्रमाणपञ व सन्माचिन्ह देऊन केला गौरव
रोहा तालुक्यातील सारसोली येथील द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय येथील अकरावी आणि बारवीच्या विद्यार्थ्यांनी लोककल्याणकारी राजा शिवछञपती या विषयावर आधारित वकृत्व केले... तर सदरच्या आयोजीत स्पर्धेत एकून १० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता... स्पर्धकांपैकी कु.सिद्धी तांडेल हिने प्रथम क्रमांक, स्वप्नाली वारंगे हिने द्वितीय क्रमांक तर दक्ष ओळांबे याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले... विजेत्यास्पर्धेच्या नियमानुसार उत्कृष्ठ स्पर्धकांना तसेच स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने प्रमाणपञ व सन्माचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले..
काॅलेजच्या प्राचार्या श्रीमती.मीनाक्षी केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले मोलाचे मार्गदर्शन
वक्तृत्व स्पर्धेच्या या कार्यक्रमात काॅलेजच्या प्राचार्या श्रीमती.मीनाक्षी केसरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले... तर श्रीमती संपदा मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिवविचारांची गरज पटवून दिली... तसेच इतर शिक्षक वृंद दिलीप शेळके सर, श्रीमती. वैष्णवी बलवत, श्रीमती.समीक्षा जंगम यांनी कार्यक्रमला उपस्थित राहून मोलाची कामगिरी बजावली...
प्रतिष्ठानच्या वतीने सुशील घाटवळ, सौरभ गोळे, मयुर रटाटे, सुमित खेडेकर व इतर सदस्य कार्यक्रमाला उपस्थित
विद्यार्थी वर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत बर्डे यांनी प्रतिष्ठानचे कार्य व गडसंवर्धनाची गरज यावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.तर विश्वास सानप यांनी पर्यावेक्षकाची भूमीका पार पाडली.... प्रतिष्ठानच्या वतीने सुशील घाटवळ, सौरभ गोळे, मयुर रटाटे, सुमित खेडेकर आदि सदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले...
.jpeg)