महाराष्ट्र वेदभुमी

श्री भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने वृक्षा रोपन....स्वीकारले पालकत्व


कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे

भैरवीनाथ मिञमंडळाच्या वतीने गाव परीसरात वृक्ष लागवड करत त्या झाडांचे संवर्धन आणि संरक्षण

पर्यावरणाचा ढासळता समतोल आणि बेसुमार वाढणारी वृक्षतोड याला कुठे तरी आळा बसावा आणि समाजामध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने रोहा तालुक्यातील धामणसई या गावातील युवा वर्गाने वृक्षारोपणांचा कार्यक्रम हाती घेतला असून गावातील श्री.भैरवीनाथ मिञमंडळाच्या वतीने गाव परीसरात वृक्ष लागवड करत त्या झाडांचे संवर्धन आणि संरक्षण तसेच पालकत्व स्वीकारून एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे...

कालवा दुतर्फा मार्गावर विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यासाठी "रेष्मा कृषी सेवा केंद्र" या संस्थेकडून झाडे वाटप 

निसर्गाने हिरवी शाल पांघरलेल्या रोहा तालुक्यातील परीसरात निसर्गरम्य नटलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या धामणसई गावाला निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे..याच निसर्गाची हानी टाळण्यासाठी आणि जमिनीची धुप रोखण्यासाठी पर्यावरणपूरक म्हणून येथील तरूणांनी केलेला उपक्रम कौतुकास्पदच म्हणावा लागेल...गावाच्या लगत असलेल्या कालवा दुतर्फा मार्गावर विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.. त्यासाठी "रेष्मा कृषी सेवा केंद्र" या संस्थेकडून  झाडे वाटप करण्यात आली... त्यांची लागवड श्री भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे...

श्री भैरवनाथ मित्र मंडळी पर्यावरण प्रेमींनी तसेच तरूणांनी घेतला ऊस्फुर्तपणे सहभाग

सदर वृक्षारोपणच्या या उपक्रमात गावातील श्री भैरवनाथ मित्र मंडळी पर्यावरणप्रेमींनी तसेच तरूणांनी ऊस्फुर्तपणे सहभाग नोंदवत या वृक्षांची लागवड करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post