महाराष्ट्र वेदभुमी

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी तळा नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.


नंदिनी भोसले प्रतिनिधी तळा 

नीलिमा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी 

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी... या मागणीचे निवेदन तळा नाभिक संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले आहे...

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा सुधाकर चव्हाण ही तरुणी झाली होती बेपत्ता

दापोली स्टेट बँकेत नोकरी करीत असलेल्या चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा सुधाकर चव्हाण ही तरुणी बेपत्ता झाली होती... व मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीमध्ये नीलिमा चव्हाण हीचा मृतदेह आढळून आला होता...सदर मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने तिच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्त्या करण्यात आली असल्याची शक्यता आहे...

सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार स्वाती पाटील यांना नाभिक संघटनेचे  निवेदन 

त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार स्वाती पाटील यांना नाभिक संघटनेतर्फे देण्यात आले आहे... याप्रसंगी नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुपेश साळुंखे,उपाध्यक्ष संजय शिर्के,सेक्रेटरी वैभव शिर्के,खजिनदार योगेश शिर्के यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post