अपूर्ण महामार्गामुळे कोकणचा विकास अधिक रखडणार त्यामुळे आता तर चक्क केंद्रातले व राज्यातले बांधकाममंत्री आमदार खासदार मंत्री यांचे फोटो बॅनर
मुंबई गोवा महामार्गावरील भयानक पडलेले मोठ मोठे खड्डे आता कोकणवाशीयांच्या चांगलेच हृदयात पेटले असल्याचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून सरकार सह आमदार खासदार यांचा निषेध व्यक्त करत वेगवेगळे फोटोग्राफ तसेच विविध व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत... तर अपूर्ण झालेल्या महामार्गामुळे कोकणचा विकास अधिक रखडणार त्यामुळे आता तर चक्क केंद्रातले व राज्यातले बांधकाममंत्री तसेच कोकणातील आमदार खासदार मंत्री यांचे फोटो बॅनर बनवून त्यावर चक्क "रोड नाही तर वोट नाही" अशा प्रकारचे ब्रीद वाक्य करत व्हॉट्स ॲप फेस बुक युट्यूब अशा विविध सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून त्यांना असंख्ये लाईक मिळत असून या मार्गाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे...
वाहनांचे टायर पंक्चर होत असल्याने वाहने नादुरुस्त मालकांना तसेच चालकांना मोठा खर्चाचा बोजा
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकणवाशियांचे दुखणे कायमच राहिले आहे... या मार्गाची दुरवस्था झाली असून पेण, वडखळ,गडप,कासू, नागोठणे , वाकण,सुकेळी, खांब, पुगाव, पुई,कोलाड आंबेवाडी नाका, वरसगाव,ते इंदापूर या टप्यातील अनेक भागात महामार्ग उखडला गेला आहे... त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते तर मोठमोठे खड्डे पडले असल्याने मार्ग शोधणे वाहन चालकांना कठीण होऊन बसले आहे...या खड्ड्यातील खडी बाहेर निघाली आहे...त्यामुळे खड्डयात अडकून वाहने बंद पडल्याने प्रवाशांवर मोठे संकट निर्माण होत आहे... तसेच वाहनांचे टायर पंक्चर होत असल्याने वाहने नादुरुस्त मालकांना तसेच चालकांना मोठा खर्चाचा बोजा सहन करावा लागतो..या रस्त्याचा फटका प्रवासी चालकांना बसत आहे....
सरकार विरोधात तसेच कोकणातील आमदार खासदार मंत्री यांच्या नावाने बोंब मारत रस्ता नाही तर वोट नाही... तीव्र संताप व्यक्त
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यानी विशेष लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे... मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव, अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळा होऊन बसला असल्याने याबाबत आता कोकण वाशीयांच्या हृदयातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...तर दुसरीकडे सरकार विरोधात तसेच कोकणातील आमदार खासदार मंत्री यांच्या नावाने बोंब मारत रस्ता नाही तर वोट नाही असे कोकणातील आमदार खासदार मंत्री यांचे बॅनर तसेच या मार्गाबाबत भजन,गायन असे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत...
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचा मार्गदर्शनाखाली बोंबाबोंब आंदोलन वाकण नाक्यावर
यासाठी उद्या बुधवारी ९ ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर कासू ते कोलाड दरम्यान जे खड्ड्यांचे साम्राज्य पडले आहे ते खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करावा यासाठी मराठी प्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचा प्रमूख मार्गदर्शनाखाली रायगड प्रेस क्लबचे सरकार विरोधी बोंबाबोंब आंदोलन बुधवार वाकण नाक्यावर सकाळी ११ वाजता होणार आहे...
पत्रकार बंधू, विविध सामाजिक संस्थांचा सहभाग रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्यध्यक्ष प्रशांत गोपाळे,सचिव अनिल मोरे यांचे आवाहन
या आंदोलनाचे नेतृत्व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख साहेब हे करणार आहेत तर या आंदोलनाला विश्वस्त किरण नाईक ,अध्यक्ष शरद पाबळे , कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर अदि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत... तर गेली तेरा वर्ष पत्रकार या मार्गाच्या कामासाठी लढा देत आहेत तरी देखील सरकारला जाग येते नसल्याचे आज पुन्हा सरकार विरोधी बोंबाबोंब आंदोलन, भजन आंदोलन होडी आंदोलन, हांडे आंदोलन, खड्डयात खुर्ची अशा प्रकारे होणार असले तरी हे आंदोलन सनदशीर मार्गाने होणार असून रायगड जिल्हयातील पत्रकार बंधू तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्यध्यक्ष प्रशांत गोपाळे,सचिव अनिल मोरे यांनी केले आहे...


.jpeg)