महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड आंबेवाडी नाक्यावर आज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल लंपास, सर्वत्र एकच खळबळ.


कोलाड श्याम लोखंडे

एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे  विविध प्रकारच्या कंपनीचे मोबाईल ठेवलेली मोबाईलची पिशवी केली लंपास 

कोलाड आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली असून सदरच्या घटनेत एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २,१९,५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या कंपनीचे मोबाईल ठेवलेली मोबाईलची पिशवी लंपास केल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे...तर सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक ए.एस साबळे तसेच त्यांचे सहकारी यानी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली...

दुकानाचे शटर लावून पिशव्या दुकानाच्या व्हरांड्यात ठेऊन  समोरील रोडवर असलेल्या गाडीचे उघडण्यास गेले लॉक 

याबाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवा सुबिर करमोकर वय वर्ष ३०, रा. रूम नं ४०२,स्वामी हिरीटेज,ए विंग,सेवादल आळी,रोहा. यांचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील तारीख,वेळ व ठिकाण याची खबर देणारे यांनी त्यांच्या न्यु टाईम सेंटर अन्ड मोबाईल या दुकानामधून वरील किमतीचे मोबाईल तीन पांढ-या रंगाची कापडी पिशवी त्यावर विमल असे लिहीलेले होते...या कापड़ी पिशव्या घेऊन ते दुकानामधून बाहेर आले...त्यांनी दुकानाचे शटर लावून त्या पिशव्या दुकानाच्या व्हरांड्यात ठेऊन ते समोरील रोडवरील असलेल्या गाडीचे लॉक उघडण्याकरीता गेले असताना त्यापैकी एक कापडी पिशवी मधील वरील वर्णनाचे व किमतीचे १६ मोबाईल असा एकूण २,१९,५००.रुपयाचा माल खबर देणारे यांच्या संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे उद्देशाने स्वतःच्या फायदयाकरीता चोरी करून घेऊन गेला...

कोलाड पोलीस निरिक्षक ए.एस साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार एन डी चव्हाण यांच्याकडून अधिक तपास 

म्हणून पोलीस ठाणे गुरन कोलाड पोस्टे गुरनं ००७६/२०२३ भा.दं.वि.क. ३७९३७९ प्रमाणे याची नोंद करण्यात आली असून कोलाड पोलीस निरिक्षक ए.एस साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अमलदार एन.डी चव्हाण अधिक तपास करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post