शहानवाज मुकादम प्रतिनिधी रोहा
संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट वर टाकण्यात यावे चणेरा ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून मागणी..
तालुक्यातील चणेरा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली असुन विषय क्र:५ गावे हर घर जल घोषित करणे या विषयावरून चणेरा ग्रामस्थांकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाची मुद्दत दि:३१/०७/२३,रोजी संपली असुन सदरचे काम बंद असुन मुळ ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी ग्रामपंचायत चणेरा ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून होत आहे...
अनेक योजनांचे कामे दलालाकडुन होत असल्याची चर्चा,राजिप ने निवडलेले मुळ ठेकेदार गायब...
हा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला...मात्र प्रशासक व ग्रामसेवक यांनी सदरचा ठराव लिहिण्यास विरोध केला आहे....ग्रामपंचायत चणेरे चे मा.सदस्य श्री प्रकाश जाधव,ग्रामस्थ प्रसन्ना घाग तर यांच्या सहीत ७५ ग्रामस्थांकडून गट विकास अधिकारी रोहा व मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दलालांकडून काम सुरू करण्यात आले होते... परंतु हे काम सध्या बंद अवस्थेत आहे...
तक्रारदारांना ग्रामपंचायतीवर विश्वास नसल्यास त्यांनी वरिष्ठांकडून चौकशी करावी चणेराचे ग्रामसेवक यांचे उत्तर
सदर विषयी ग्रामपंचायत चणेराचे ग्रामसेवक याना फोनवरून विचारणा केली असता ते म्हणाले सदरचा विषय हा या सभेत नसल्याने या विषयी ठराव मंजूर करण्यात आला नसुन विषय ग्रामपंचायत कडून राजिप ला पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे...तसेच तक्रारदारांना याविषयी माहिती देण्यात येईल...परंतु तक्रारदारांना ग्रामपंचायतीवर विश्वास नसल्यास त्यांनी वरिष्ठांकडून चौकशी करावी.. असे उत्तर चणेराचे ग्रामसेवक यांचे मिळाले आहे...
केलेल्या कामाचे पाहणीनुसार अंदाजपत्रक तयार केल्याचे दिसत नसुन चुकीचे केले अंदाजपत्रक तयार
सदर च्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांवर रोहा तालुक्यातील अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या चर्चा व वृत्त पत्रात प्रसिद्ध होत आहेत...रायगड जिल्हा परिषदकडून निवड करण्यात आलेले ठेकेदार यांना कामाबाबत कोणतीही माहिती नसुन सदरचे योजना दलालांकडुन होत असल्याचे समोर येत आहे...राष्ट्रवादीच्या एका नेत्यांकडून संबंधित मुळ ठेकेदारास केवळ फोनवरून माहिती देवुन सदरचे काम दलालाकडुन होत असल्याचे दिसत आहे...तसेच काही ठिकाणी सदर कामाचे केलेल्या पाहणीनुसार अंदाजपत्रक तयार केल्याचे दिसत नसुन चुकीचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे..खैरेखुर्द येथे पाण्याच्या टाकीचा ऑडिट रिपोर्ट न पहाताच नादुरुस्त टाकीलाच जोड टाकी मंजूर केल्याचे उघड होत असून सदर विषयात ग्रामपंचायतीला सर्वेवेळी सोबत न घेतल्याने हे प्रकार समोर आले आहे... योजनेचा लाभ केवळ ठेकेदारास व दलालास होणार असल्याचे चित्र दिसत आहे....
शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून तात्काल दखल घेण्यात येण्याची मागणी
प्रशासनाकडून सदर योजनेंतर्गत सुरु.असलेले व बंद अवस्थेत असलेल्या कामांवर चौकशीअंतर्गत कारवाई होण्याची आवश्यकता असून ग्रामपंचायतीकडून हर घर जल घोषित करणे या विषयावर नागरिकांकडून विरोध असल्याचे व अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार होत असल्याच्या तक्रारी समोर येत असुन शिंदे-फडणवीस सरकारने याची तात्काल दखल घेण्यात यावी आशी मागणी होत आहे....

