महाराष्ट्र वेदभुमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे येथे युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा


अक्षय कदम प्रतिनिधी माणगाव

कॅन्टीनमध्ये रस्सा वड्यात सापडली घोण ...युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पदाधिकारी आक्रमक 

दि.४ऑगस्ट २०२३ रोजी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महाड विधानसभा समन्वयक रोहितजी पारधे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे युवा सेना व शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते... तंत्रशास्त्र विद्यापीठामधील चालू असलेल्या कॅन्टीनमध्ये रस्सा वड्यात घोण (गोम) सापडली...

कॅन्टीन चालकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी...कुलगुरूकडून मिळाला योग्य प्रतिसाद   

त्यामुळे आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून तेथील स्वच्छतेवर खूप मोठा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे...त्यासाठी संबंधित कॅन्टीन चालकावर योग्य ती कारवाई करावी...अशी मागणी युवा सैनिकांनी कुलगुरू कारभारी काळे यांच्याकडे निवेदन देत केली...त्यावेळी कुलगुरूकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला असून लवकरच कॉलेज प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करेल...असे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे...

लोणेरे विभाग प्रमुख,तालुका चिटणीस,पन्हळघर,सरपंच गोरेगाव शहर अधिकारी विद्यापीठ अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच तालुक्यातील युवा सैनिक उपस्थित

त्यावेळी तेथे लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,मांजरवणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर ,युवासेना माणगाव तालुका चिटणीस अक्षय कदम, विद्यापीठ युनिट अध्यक्ष प्रतीक साळुंके पन्हळघर सरपंच हरदास शेडगे, गोरेगाव शहर अधिकारी रोहित पहेलकर, विद्यापीठ उपअध्यक्ष, देवांग उतेकर उपाध्यक्ष, मंगेश निगडे ,मितेश ढेपे,आशिष ढेपे, राज म्हात्रे राहुल करळेकर, वरून राऊत, सुमेध पैकराज,सूरज पाटील तसेच तालुक्यातील युवा सैनिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post