कोलाड (श्याम लोखंडे)
सरकारने मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाचा मांडला खेळ... कमालीचे प्रवासी संतप्त
ईडा पिडा टळो दे सरकारला जाग येऊ दे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये मुंबई गोवा महामार्गाची नोंद होऊ दे आणि संपूर्ण जगभरात त्याचे नाव गाजु दे...गेली तेरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले... याला जबाबदार कोण?... हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे...तर दुसरीकडे सरकारने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाचा मांडला आहे...त्यामुळे आता कमालीचे प्रवासी संतप्त झाले असून चक्क आता विविध मीडियावर तसेच मोबाईल व्हॉट्स ॲप,फेस बुक ,युटुबवर याबत वेगवेगळे व्हिडिओ फोटो कॉमेंट होत असल्याने या रखडलेला मार्गावरील खड्डे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसतात...
मंत्री मोहदय पाहणी करून आश्वासन देऊन निघून जातात... मार्गावरून प्रवास करते गोरगरीब जनता..गेली तेरा वर्ष जनतेला सतावातोय सरकारचा नाकर्तेपणा
गेली तेरा वर्षाहून अधिक काळ लोटला परंतु मुंबई गोवा महामार्ग काय पूर्ण होईना देशातील अनेक महामार्ग झाले मात्र मुंबई गोवा महामार्गाला कोणाची दृष्ट लागली आहे का हाच संभ्रम आता निर्माण झाला आहे...तर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात एक ना धड भाराभर चिंध्या हीच परीस्थिती अनेकांनी सत्ता अनेकांचा सत्तेत मंत्रिपदाचा वाटा सारे मंत्री मोहदय येतात पाहणी करतात आश्वासन देऊन पुन्हा निघून जातात मात्र या मार्गावरून कायम प्रवास गोरगरीब जनतेलाच करावा लागतो आहे...त्यामुळे सरकारचे की राजकीय नेतेमंडळीचा हा नाकर्तेपणा आहे हाच प्रश्न गेली तेरा वर्ष जनतेला पडला आहे...
पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे नाहक बळी...त्यांचे कुटुंब आले रस्त्यावर...त्यामुळे नवी उपाय योजना म्हणून थेट नव्याने काँक्रिटिकरण सरू
कोकणात जाणाऱ्या मार्गाची सुरूवात ही पनवेल पलस्पे येथून होते तसेच या मार्गातील पहिला टप्पा हा पलस्पे ते इंदापूर यालाच प्रथम शुभारंभ करण्यात आले...तर केवळ सत्तर ते ऐंशी किमी अंतरावचा मार्ग करता करता एक तप उलटून गेला तर तेरा वर्ष रखडलेल्या कामांची दखल घेणार कोण?...मार्ग होता होईना खड्डे बुजता बुजेना हाच कारभार अनेक अनेक वर्ष सुरू आहे...तर पडलेल्या भयानक खड्ड्यांमुळे अनेकांचे नाहक बळी गेले...त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत...त्यामुळे नवी उपाय योजना म्हणून त्यावर आता थेट नव्याने काँक्रिटिकरण सरू करण्यात आले आहे...
१७ नंबरचा नॅशनल हायवे आजच्या घडीत हा ६६ नंबरवर... मार्गाचे महत्व वाढले की कमी झाले?... निर्माण झाला हा देखिल प्रश्न
एकेकाळी १७ नंबरचा हा नॅशनल हायवे आजच्या घडीत हा ६६ नंबरवर गेला आहे... त्यामुळे या मार्गाचे महत्व वाढले की कमी झाले आहे हा देखिल प्रश्न निर्माण झाला आहे...जर याचे महत्व वाढले असले तर मग एवढी वर्ष हे काम रखडले का ?.. शनिवारी ५ ऑगस्ट रोजी पुन्हा राजाचे बांधकाम मंत्री यांनी संबधित अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या समवेत या महामार्गाची पाहणी केली आहे...त्यातून काय निष्पन्न होत आहे... याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे...परंतु मंत्री मोहदाय अनेकदा पाहणी करून गेले...त्यात अधिक मोठ मोठे खड्डे पडले असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत...तर याच राज्यातील यानंतर कोल्हापूर,सोलापूर,नाशिक, नागपूरचा समृध्दी महामार्ग झाला... परंतु कोकणातील मार्ग होत नाही... हे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे...
राज्यातील सत्ता पालट नेत्यांच्या वाऱ्या दिल्लीला तर कोकणातील मार्ग हा सद्या गल्लीतीला असे झाले..याकडे बघणार कोण?
राज्यातील सत्ता पालट नेत्यांच्या वाऱ्या दिल्लीला तर कोकणातील मार्ग हा सद्या गल्लीतील असे दिसून येत आहे... याकडे बघणार कोण?... बांधकाम मंत्री येतात घोषणा करतात जातात या महामार्गावरून हजारो प्रवासी वाहनचालक दिवसरात्र प्रवास करीत असतात...रस्त्यावर पडलेल्या मोठ खड्ड्यांमुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो... रात्रीच्या वेळी खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज येथे छोटे मोठे अपघात होत आहेत...त्यात सर्वसामान्य माणसाचा जीव निघून जातो... मोठी दुर्दैवी घटना घडली की क्षणाचा विलंब न लावता ताबडतोब उपाय योजना केल्या जातात...तदपूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्यात यावे तसेच खड्ड्यात वाहने अडकून बंद पडतात ...त्यामुळे पुढे येणाऱ्या कोकणातील प्रत्येक सण हा उत्सवापूर्वी व्हावा...यासाठी पुन्हा हे खड्डे संबधित खात्याने याची डागडुजी करून ते भरावे...अशी मागणी येथील प्रवासी नागरिक करत आहेत...तर गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकर होईल ...अशी अलंकार खांडेकर,सामाजिक कार्यकर्ते खांब यांनी आपली प्रतिक्रिया दिली...
बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या यंत्रणेला दिल्या सूचना
बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या... सध्या पावसाळयात महामार्गाचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे... यामध्ये हलगर्जीपणा नको...तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे... असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले...यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते....
