ओमकार नागावकर अलिबाग
विद्यार्थ्यांनी स्वतःची ताकत आणि कमकुवत व दुवे ओळखून ध्येय निश्चित करावे
जे.एस.एम. महाविद्यालयात शिव विद्या प्रबोधिनी व बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमात मत व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमीचे संस्थापक, संचालक विजय कदम यांनी युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली.. विद्यार्थ्यांनी स्वतःची ताकत आणि कमकुवत व दुवे ओळखून आपले ध्येय निश्चित करावेत...आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे मागदर्शन केले...
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित...
याप्रसंगी IAS अकॅडमीचे संस्थापक व उपनेते विजय कदम, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक अमीर ठाकूर, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहर प्रमुख संदिप पालकर, उपजिल्हा संघटक अजित पाटील, युवासेना अलिबाग तालूका प्रमुख गिरीश शेळके, जे.एस.एम प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील, प्रा. डॉ. सदाशिव कानडे, प्रा. संतोष हाके, प्रा. कपिल कुलकर्णी, प्रा. सुनील ठोकळे, डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सिमंतिनी ठाकूर, ग्रंथपाल सुबोध डहाके, प्रा. श्वेता मोकल, व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते...
जे.एस.एम. महाविद्यालयातून जास्तीत जास्त अधिकारी घडावे यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम भविष्य घडविण्याचे माध्यम आहे... या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित शिबीराचा लाभ घ्यावा.. जे.एस.एम. महाविद्यालयातून जास्तीत जास्त अधिकारी घडावे यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटीलांनी केले...तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करून यश संपादन करावे...तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल...असे आश्वासन देऊन कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले...प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले...
