महाराष्ट्र वेदभुमी

१४३ आदिवासी बांधवांना घरे मंजूर..एक हात मदतीचा’अंतर्गत रोहा तहसीलदारांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार घराना मंजुरी...

 


रायगड कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे

कोलाड येथील १४३ आदिवासी बांधवांना घरे मंजूर ‘एक हात मदतीचा’अंतर्गत रोहा तहसीलदार देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

रोहा तालुक्यातील कोलाड येथील १४३ आदिवासी बांधवांना त्यांच्या हककाची व मालकीच्या घरांना मंजुरी देण्यात आली आहे...तसेच याचे प्रमाणपत्र रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच्या हस्ते सदरच्या बांधवांना देण्यात आले आहे...यावेळी अप्पर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांसह महसूल विभागाचे अधिकारी कोलाडचे मंडळ अधिकारी साजाचे तलाठी तसेच लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते...

नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी...तसेच शासकिय कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास शासनाबद्दल  वृद्धिगंत व्हावा.. सप्ताहानिमित्ताने रोहा तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत...

१ऑगस्ट पासून महसूल सप्ताहानिमित्ताने रोहा तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्या पार्शवभूमीवर लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या अनुषंगाने रोहा महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिक अधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य तो लाभ घेता यावा.... त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी...तसेच शासकिय कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास शासनाबद्दल  वृद्धिगंत व्हावा.. यासाठी विशेष मोहीमेतून सदरच्या लाभार्थ्यांना लोकाभिमुख उपक्रम अंतर्गत घरांचे पत्रक वाटप करण्यात आले आहे...

कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार आदिवासी समाजाला कलम १७ नुसार प्रमाणपत्रे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या हस्ते वाटप 

३ ऑगस्ट "महसूल दिन" निनानिमिताने महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा उपक्रम रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्यावतीने गुरुवारी कोलाड आदिवासी वाडी येथे गावातील एकूण १४३ घरे कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार मंजूर करून आदिवासी समाजाला कलम १७ नुसार प्रमाणपत्रे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले...यापूर्वी सदरची वस्ती ही पूर्ण आदिवासी वाडी खाजगी जागेत त्यांची वस्ती होती... त्यांना घरठाण मंजूर करून मालकीची घरे व त्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले....त्यामुळे आदिवासी बांधवाकडून प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post