स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाडचा १३ वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण स्नेहसंमेलन मोठया उत्सहात संपन्न
स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाडचा १३ वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण स्नेहसंमेलन गुरुवार ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वा. श्रीमती जयश्री वसंत महाबळे आंबेवाडी नाका कोलाड विभागीय अध्यक्ष मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुरेश पालकर अध्यक्ष रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्सहात संपन्न झाला ...
सीमेवर शहीद झालेले जवान व आपल्यातील देवाज्ञा झालेले सदस्य जेष्ठ नागरिक यांना वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली....
स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमाची सुरुवात सुरवात गणेशपूजन, ईशस्तवन, महाराष्ट्र गीताने करण्यात आली असून सीमेवर शहीद झालेल्या जवानांना व आपल्यातील सदस्य देवाज्ञा झालेला जेष्ठ नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली...कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रणिता गांधी यांनी केले...तर वार्षिक अवहाल वाचन रामचंद्र गोरीवले यांनी केले...यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले...
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते आधार काठी व सन्मान पत्र देऊन ज्येष्ठ नागरिक नंदकुमार पवार यांच्या मार्फत सत्कार ...
यावेळी संघटनेतील ज्येष्ठ नागरिक नंदकुमार पवार यांच्या मार्फत देण्यात आलेल्या ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते आधार काठी व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ज्या जेष्ठ नागरिक दापांत्य विवाहाला ५० वर्षे पुर्ण झालेल्या हयात भाग्यवंत जोडप्यांचा ही भेट वस्तू व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला....
नागरिक समन्वय समिती सौ सुनिता पालकर,नारायण चव्हाण पोलिस उपनिरीक्षक कोलाड, सदस्या प्रितम पाटील, ज्येष्ठ नागरिक व महिला सदस्य वर्ग बहुसंख्येने उपस्थित....
याप्रसंगी विचार मंचावर सुरेश पालकर अध्यक्ष रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती,सौ.सुनिता पालकर,नारायण चव्हाण पोलिस उपनिरीक्षक कोलाड, प्रितम पाटील रोहा तालुका महिला अध्यक्षा,आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेशदादा महाबळे,नारायण पाटील सचिव रोहा,दशरथ खाजणे गोरेगाव,बबनराव सावंत गोरेगाव,मारुती राऊत ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष, प्रविण गांधी कार्याध्यक्ष,अविनाश म्हात्रे उपाध्यक्ष,अशोक कदम सचिव,पांडुरंग सानप सहसचिव, केशव महाबळे खजिनदार,गोरखनाथ कुर्ले मुख्य सल्लागार, नंदकुमार पवार हिशेत पासणीस, सदस्य दगडू बामुगडे, बळीराम ठोंबरे, हरिचंद्र जाधव, मंगला राऊत, प्रणिता गांधी सह ज्येष्ठ नागरिक व महिला सदस्य वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास,मोफत आरोग्य सेवा,पेन्शन योजना त्याच विविध प्रलबिंत असणाऱ्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल
अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना जिल्हा अध्यक्ष सुरेश पालकर यांनी सांगितले कि ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास,मोफत आरोग्य सेवा,पेन्शन योजना त्याच विविध प्रलबिंत असणाऱ्या समस्या यांचा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल मंडळाचे ज्येष्ठ नागरिक नंदकुमार पवार यांचे ही विशेष कौतुक करत ते वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काही ना काही मद्दत करीत असतात अशी माणसे समाजात फार कमी असल्याचे सांगत कोलाड संघटनेचेही कौतुक केले.
कोलाड पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांनी मनोगत सांगताना..हिरा तो दो प्रकार का होता है एक समुदर मे और दुसरा हिरा तुम है असा आनंदात व्यक्त केला शेर केला
तसेच कोलाड पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमला पहिल्यांदाच आलो असुन एवढ्या मोठया संख्येने व एकीने ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून अतिशय उत्तम कार्यक्रम करीत आहेत.पैसेवाला श्रीमंत नसतो तुम्ही खरे श्रीमंत आहात तुम्ही जरी वयाने ७५ वर्षाचे असलात तरी तुमच्या चेहऱ्यावर तरुणपणा जाणवत असल्याचा आनंद व्यक्त करत हिरा तो दो प्रकार का होता है एक समुदर मे और दुसरा हिरा तुम है असा शेर व्यक्त केला...तर उपस्थित महिला अध्यक्षा प्रितम पाटील, सरपंच सुरेश महाबळे,अध्यक्ष मारुती राऊत, सल्लगार गोरखनाथ कुर्ले यांनी ही ज्येष्ठ नागरिक यांना मोलाचे मार्गदर्शन केले...
महादेव महाबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे मानले आभार ...
सदरच्या कार्यक्रमात अहवाल वाचन रामचंद्र गोरीवले तर सूत्रसंचालन अविनाश म्हात्रे सर यांनी केले....,महादेव महाबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले...
.jpeg)