आदिवासी मुला मुलींनी वृक्षांना राखी बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला साजरा
वातावरण बदलाचे परिमाण म्हणून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत... त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी निसर्गाचीk जोपासना करा व वृक्ष लावा वृक्ष जगवा - डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन..रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील असलेल्या अंकुर ट्रस्ट संस्थेंमार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आदिवासी मुला मुलींनी वृक्षांना राखी बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला..
निसर्गाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची मोठ्या संख्येने लागवड व जोपासना करण्यासाठी दिला संदेश
यावेळी डाॅ. मैत्रेयी पाटील यांना आरोग्यसेवा देऊन आदिवासींचे संरक्षण केले...म्हणून तसेच आर टि ओ श्वेता शेळके व शुभांगी गायकवाड यांनाही मुलांनी राख्या बांधून सण साजरा केला...वातावरण बदलाचे परिमाण म्हणून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत...त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी निसर्गाची जोपासना करा व वृक्ष लावा हा संदेश दिला... निसर्गाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची मोठ्या संख्येने लागवड करून त्यांची जोपासना करणे गरजेचे आहे...असे डाॅ.वैशाली पाटील यांनी सांगितले...
