महाराष्ट्र वेदभुमी

जोगवाडी येथे कान्होबा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

 


तळा प्रतिनिधी: (श्रीकांत नांदगावकर)

एकनाथ शिंदे यांच्या फंडातून जोगवाडी येथे कान्होबा मंदिरासाठी २५ लाखांचा निधी मंजूर

तळा शहरातील जोगवाडी येथे कान्होबा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फंडातून जोगवाडी येथे कान्होबा मंदिरासाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.यासाठी शिवसेना तळा शहर प्रमुख राकेश वडके यांनी विशेष पाठपुरावा केला होता.या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडला. 

सर्वपक्षीय नगरसेवक तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व जोगवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी कान्होबा नाथांची मिरवणूक,होम हवन, धार्मिक विधी व महाआरती तसेच मान्यवरांचे सत्कार व महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदेगट शहरप्रमुख राकेश वडके,तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लीलाधर खातू,स्थानिक नगरसेवक मंगेश पोळेकर, सर्वपक्षीय नगरसेवक तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व जोगवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post