महाराष्ट्र वेदभुमी

खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूलमध्ये स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.


कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे) 

विद्यार्थी,शिक्षक,पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित

रोहा तालुक्यातील खांब विभागात इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७७ वा स्वातंत्रदिन कोलाड आंबेवाडी येथील डॉ गांधी नर्सिंग होमचे डॉ विनोद गांधी यांच्या शुभहस्ते या शाळेचा ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले...यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे, संचालक सुधीर लोखंडे, डॉ श्याम भाऊ लोखंडे,दिलीप मोहिते,ह.भ.प.नथुराम जाधव, रामचन्द्र मोरे, उदय डवले, सुधीर लोखंडे, दिलिप लाडगे,निलेश निळेकर, अलंकार खांडेकर,उदय तेलंगे,राहुल मोहिते ,मंगेश महाबळे, सुनिल तुपकर,जगन्नाथ भोईर,रोहिदास भोर,तेजस जाधव,सचिन गोले,सुनील कान्हेकर,पंकज कोकाटे,सौ अनुपमा चितळकर, प्रणाली धनावडे,सूर्यकांत पोटफोड़े, विशाल मोहिते,प्रदीप मरवडे, अमित भोईर,दिलीप मोहिते,अर्चना परबलकर आशा पवार, आदी विद्यार्थी शिक्षक पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...

विद्यार्थ्यांना मोफत हेल्थ आरोग्य तपासणी वडिलांच्या प्रित्यर्थ रु५०००/ चा शाळेसाठी दिला धनादेश

१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर विविध गीत तसेच पथ नाट्य आणि देश स्वातंत्र्य काळात ज्या ज्या हुत्म्यानी देशासाठी बलिदान दिले अशा थोरविरांबद्दलची महती पटवून दिली... तसेच डॉ श्यामभाऊ लोखंडे,सुधीर लोखंडे,अलंकार खांडेकर, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे डॉ विनोद गांधी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले...या शाळेत माझ्या हॉस्पीटलच्यावतीने येथील सर्व विद्यार्थ्यांचे मोफत हेल्थ आरोग्य तपासणी या शाळेत केली जाईल... तसेच त्यांची पुढे देखील विद्यार्थ्यांना काही किरकोळ आजार झाल्यास त्यांची तपासणी माझ्या हॉस्पीटलच्या माध्यमातुन मोफत करणार असल्याचे स्वातंत्र दिनानिमित्त जाहीर केले आहे...तसेच त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ रुपये ५००० चा धनादेश या शाळेसाठी दिला... .

Post a Comment

Previous Post Next Post