महाराष्ट्र वेदभुमी

राखी विथ खाकी" जिल्हापोलीस अधीक्षकांना राखी बांधून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महिला पदाधिकाऱ्यांकडून रक्षाबंधन साजरे

 




अलिबाग (ओमकार नागावकर) :

अलिबाग पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिलांच्या संरक्षणाची मागितली ओवाळणी 

 रक्षाबंधन निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार (ता.२९) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कारागृह निरीक्षक तसेच अलिबाग पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिलांच्या संरक्षणाची ओवाळणी मागितली... शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख दिपश्री पोटफोडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा कारागृह निरीक्षक ए.एस.कारकर अलिबाग यांच्यासह कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला...महिला जिल्हाप्रमुख दिपश्री पोटफोडे, महिला शहर संघटिका सौ.राखी कमलेश खरवले, तनुजा पेरेकर, सलोनी गीरी, दिपेश्री भोई, स्नेहल देवळेकर, ममता खरवले, शितल पेडणेकर आदी महिला उपस्थित होत्या...

भारतीय संस्कृतीमध्ये असलेला स्नेहसंबंध जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांमध्ये पाहावयास मिळणार नाही..

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाचा सण आहे... भावा प्रति बहिणीचे असलेले प्रेम आणि बहिणीच्या प्रत्येक संकटामध्ये तिच्या पाठीमागे ठामपणे उभा रहणारा तिचा भाऊ हा भारतीय संस्कृतीमध्ये असलेला स्नेहसंबंध जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांमध्ये पाहावयास मिळणार नाही...आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले भारतीय बहिणीचे भाऊ आपल्या कामामुळे आपल्या बहिणीकडे जाऊ शकत नाहीत...हे अडचण लक्षात घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कारागृह व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या...

Post a Comment

Previous Post Next Post