महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग सुरूच माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहीर धारकर यांच्या जाहीर प्रवेश.


पेण  (प्रतिनिधी) : 

पेणचा पुढचा आमदार शिवसेनेचाच - अनंत गीते

दिनांक.२२ऑगस्ट पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहीर धारकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला...चांदा ते बांदा परिवर्तन घडणार असून अगामी निवडणुकांमध्ये सत्ता बदल होणारच... पेणमध्ये जाहीर सभा घेऊन पेणकरांशी संवाद साधण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले...शिशिर धारकर यांच्या पक्षप्रवेशाने रायगडचे राजकीय समीकरणे बदलणार आगामी निवडणुकीत पेणचा आमदार शिवसेनेचाच असेल अशी खात्री माजी अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी यावेळी व्यक्त केली...

धारकर पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशाने लोकसभेच्या निवडणुकीवर  प्रभाव होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

 धारकर घराण्याचे पेणकरीता मोलाचे योगदान असून धारकरांनी वर्षानुवर्ष पेण नगर परिषदेवरती एक कलमी सत्ता प्रस्थापित करून नागरिकांच्या समस्या सोडवून शहराचा विकास केला... पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शिशिर धारकर यांना मानणारा मोठा गट आहे...धारकर पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशाने पेण नगरपालिकेसह, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीवर निश्चित प्रभावी परिणाम होईल...अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे...

पक्षप्रवेशाला शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित 

 या पक्षप्रवेशाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, युवासेना जिल्हा प्रमुख सुधीर ढाणे, शिवदुत प्रदीप वर्तक, उद्योजक रशाद मुजावर, वाहतूक सेनेचे श्रीतेज कदम, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, भगवान पाटील, राजेंद्र राऊत, शहर प्रमुख मयुरेश चाचड, संदीप सुर्वे, राकेश मोकल, दिलीप पाटील, जीवन पाटील, कांतीलाल म्हात्रे, विनोद म्हात्रे, पंकज शहा, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, मनोज नाजरे, शहर संघटीका छाया काईनकर, आलीना सय्यद, हिना कागदी, वसंत म्हात्रे, संजय कदम,संजय पानसे, रविंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post