महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेनेतर्फे नादुरुस्त फुंडे मार्गाची तिसऱ्यांदा दुरुस्ती फुंडे, डोंगरी,पाणजे ग्रामस्थांना व कामगारांना दिलासा.

 


रण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे )

फुंडे, डोंगरी व पाणजे गावांना व जेएनपीटी बंदर परिसरातील कामगारांना होत होता त्रास

दिनांक २२ऑगस्ट उरण शहर व जेएनपीटी या आंतराष्ट्रीय बंदरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या फुंडे, डोंगरी व पाणजे या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील फुंडे रस्त्यातील खाडीपूल हा एप्रिल२०२१ मध्ये अचानक कोसळला, या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या डाऊर नगर येथील एका तरुणांला आपला जीव गमवावा लागला होता...बंद झालेल्या या रस्त्यामुळे फुंडे, डोंगरी व पाणजे गावांना व जेएनपीटी बंदर परिसरातील कामगारांना खूप त्रास होत होता...अशावेळी सर्वांच्या मदतीसाठी पुढे असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महादेवशेठ घरत यांनी हा रोड स्वखर्चाने तयार करून व दोन वेळा स्वखर्चाने दुरुस्ती केली होती...

माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेवशेठ घरत यांचे योगदान.

मात्र या मार्गाने प्रवासी वाहनांबरोबरच डम्परसारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली... त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत.... पावसाळ्यात भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे अशा मार्गातून येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता... या चिखलमय व खड्डेयुक्त धोकादायक रस्त्याची दुरुस्ती शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख कामगार नेते  महादेवशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनाकं २० आगस्ट २०२३ रोजी पुन्हा एकदा केली आहे... त्यामुळे या मार्गावरील तीन गावातील हजारो नागरिकांना व जेएनपीटी परिसरातील कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post