महाराष्ट्र वेदभुमी

तळवडे अंतर्गत सिमेंट कॉंक्रेट रस्त्यावर रेझग्याचा वापर! निकृष्ट दर्जाचे काम सुरू अभियंता बेखबर...




रोहा प्रतिनिधी : (शहानवाज मुकादम) 

तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील तळवडे येथे सिमेंट कॉंक्रेट अंतर्गतचा तीन लाखाचा रस्ता मंजूर,सिमेंट कॉंक्रेट अंतर्गत रस्त्यावर रेझग्याचा वापर करीत काम सुरू केले आहे... मात्र अभियंता याबाबतीत बेखबर असल्याचे दिसत आहे...सदरच्या रस्त्यावर अभियंताकडून सदर ठिकाणी लाइन आऊट न करता ठेकेदाराकडून चिखलात डबर हाथरण करण्यात आली आहे....सदरचा रस्ता सिमेंट कॉंक्रेटचा असुन डबर वर १००% रेझग्याचा वापर करण्यात आला आहे...

ग्रामसेवक व अभियंता यांना बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष यांनी धरले धारेवर..

सिमेंट कॉंक्रेट करणे कामी नदीची गोडी वाळुचा वापर केल्यास  सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होण्यापुर्वीच बळीराजा शेतकरी संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष श्री गजानन सकपाळ यांनी घेतली दखल...सदर कामाचे अभियंता श्री जुजगार पंचायत समिती रोहा यांना फोनवरून सकपाळ यांनी संपर्क केला असता सदरचे काम सुरु झाल्याबाबत त्यांना कोणतीही माहिती ग्रामपंचायत खैरेखुर्द कडून देण्यात आलेली नसुन सदर ठिकाणी लाइन आऊट ही केलेली नाही...तसेच अभियंता यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतकडे सदर कामाचे अंदाजपत्रक असल्याचे सांगीतले...



ग्रामपंचायतकडे वर्कऑर्डर व अंदाजपत्रक नाही?र जि प अलिबाग कडून दखल घेण्याची मागणी .

 खैरेखुर्दचे ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांच्याकडे सकपाळ यांनी विचारणा केली असता ग्रामपंचायतकडे वर्कऑर्डर व अंदाजपत्रक नसलेचे सांगीतले...अध्यक्ष सकपाळ म्हणाले शासनाकडून मंजूर निधीचा योग्य वापर करून उत्कृष्ट दर्जेदार काम होणे गरजेचे आहे...या कामास रेझगा व नदीतील चिखल वाळुचा मी वापर करून देणार नाही...ही निधी ग्रामसेवक किवा अभियंता यांच्या घरची नसुन शासनाची आहे...अशी कानटोचणी ही केली...एखादे काम मंजूर झाले की अभियंता किवा ग्रामपंचायतला विश्वासात न घेता परस्पर काम सुरु केल्यानेच निकृष्ट दर्जाची कामे होतात...जिल्हापरिषदकडून ठेका घेतो कोण? प्रत्यक्षात कामे मात्र स्थानिक दलालाकडूनच केली जातात...मग ते कामे कोणतेही असो या विषयावर रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून दखल घेण्याची मागणी होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post