महाराष्ट्र वेदभुमी

रोहा : कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार, सुरक्षा रक्षक जागीच ठार, जिल्ह्यात खळबळ.

 


कोलाड.प्रतिनिधी: (श्याम लोखंडे) 

कोकण रेल्वमार्गावर रोहा कोलाड येथील गेट क्रमांक चार जवळ तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात ईसमाने गोळीबार केला असून कपाळाला गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली...या अनपेक्षीत घटनेने कोलाड सह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली... दरम्यान, कोकण रेल्वे सुरक्षारक्षक चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्या का करण्यात आली, याचा अंदाज अजूनही आलेला नाही..सदरच्या घटनेची माहिती मिळताच रायगड अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे,रायगड पोलिस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम ,रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर,स्थानिक कोलाड स्थानिक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्यासह श्वान पथक घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू केला आहे तर अधिक तपास श्वान पथकाद्वारे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आला आहे..या घटनेने रेल्वे प्रशासन तसेच कोलाड परीसर हादरले... त्यामुळे या घातपात घटनेचे नेमके कारण काय असावे यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे...कोकण रेल्वे मार्गावर  घडलेल्या घटनेने रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही तर मार्गावरील रेल्वे वाहतूक ही सुरळीत सुरू होती...

प्रतिक्रिया


प्रतिक्रिया

चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते... कोकण रेल्वे संघटनेवर पदाधिकारी होते...रेल्वे संघटनेच्या अंतर्गत वादातून गोळीबार झाला असावा, त्याबाबत सखोल चौकशी करावी...आमच्या भावना तीव्र आहेत अशी संतप्त प्रतिक्रीया भैयाभाई जाधव यांनी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post