अजय शिवकर :( उरण ) : रायगड: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन करत ८० जागांपैकी तब्बल ३४ जागा मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे... या यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे...
या उल्लेखनीय यशामागे RTS (Raigad Talent Search) या अभिनव उपक्रमाचा मोठा वाटा असल्याचे पालक व शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे... रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी अत्यंत मेहनत, नियोजन व समर्पणाने हा उपक्रम राबविला...
गतवर्षी या उपक्रमांतर्गत सुमारे ४००० विद्यार्थ्यांची १५० गुणांच्या ८ पेपरांच्या माध्यमातून शैक्षणिक चाचणी घेण्यात आली... त्यातून निवड झालेल्या ५ विद्यार्थ्यांचा “Raigad Scholar Student” म्हणून गौरव करण्यात आला... या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹२००० रोख पारितोषिक, ट्रॉफी, मिस इंडिया रिबन व सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹१०००, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले...
या यशात जिल्हा प्रशासनाचा मोलाचा सहभाग असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. बास्टेवाड साहेब, मा. नेहा भोसले मॅडम, शिक्षणाधिकारी मा. गुरव मॅडम, उपशिक्षणाधिकारी मा. भोपळे साहेब व मा. शेडगे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी जवळपास ₹५०,००० ची आर्थिक मदत करून या उपक्रमाला बळ दिले...
RTS उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणे हा आहे... या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ नवोदय परीक्षेतच नव्हे, तर भविष्यात कलेक्टर, इंजिनिअर, डॉक्टर, बँक मॅनेजर, शिक्षक, इन्स्पेक्टर, सी.ए., गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांसारख्या उच्च पदांवर पोहोचावे, हा उदात्त हेतू आहे...
या यशामुळे RTS उपक्रमाची उपयुक्तता अधोरेखित झाली असून, येणाऱ्या काळात हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा निर्धार शिक्षक व प्रशासनाने व्यक्त केला आहे...
