महाराष्ट्र वेदभुमी

कोपरीपुल मुलुंड- ठाणे पूर्व द्रुतगती महामार्ग क्रेन अपघात

मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील): ठाणे-मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर  कोपरी पुलावर ८ एप्रिल २०२६ रोजी क्रेन उलटल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली... ज्याचा परिणाम मुलुंडपर्यंत जाणवत होता... या अपघातामुळे साकेत ते कोपरी आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या... नोकरदारांना मोठा फटका बसला असून पोलिसांनी वाहतूक वळवली...

वाहतूक कोंडीची सद्यस्थिती आणि उपाय:साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान कोपरी उड्डाणपुलावर हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती...

परिणामी माजिवडा जंक्शन, कोपरी पूल, तीन हात नाका आणि मुलुंड पूर्व परिसरातील वाहतूक पूर्णपणे कोंडीत सापडली ...

पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना मॉडेला चेक नाका - एलबीएस मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले...परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरूअसल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागत होता...

प्रवास टाळण्यासाठी किंवा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने असा वारंवार घटनाक्रम कधी थांबणार? नेहमीच मेट्रो,तर कधी चुकीचे नियोजन यामुळे सामान्य जनतेला कठीण समस्याचा सामना करावा लागतोय... याला जबाबदार कोण? ठेकेदार, प्रशासन का सरकार,,, दाद मागायची तरी कोणाकडे ? ...

Post a Comment

Previous Post Next Post