महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई विमानतळावर अग्नितांडव,धुराचे लोड

.

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील)

टर्मिनल्स 1 वर धुराचं साम्राज्य, 

मुंबई विमानतळावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आगीची घटना घडली...  विलेपार्ले मुंबई विमानतळ टर्मिनल एकवर आग लागली असल्याचं समोर आलं आहे. ...

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे... जगातील सर्वात व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर आगीची घटना घडलीय... मुंबई विमानतळावरील टर्मिनल्स १ वर आगीची घटना घडलीय... आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली... घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आगीची घटना घडली...  विलेपार्ले मुंबई विमानतळ टर्मिनल एकवर आग लागली असल्याचं समोर आलं आहे...  संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे...

रस्त्याच्या बाजूला जमिनीतून अचानक धूर निघाला आणि स्फोट झाला....शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे...  आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलीस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे.  आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे... विमानतळावर आग लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तासाभरापासून टर्मिनल्स १ वर वाहतूक ठप्प झाली आहे... सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना हलवण्यात आलं आहे...

Post a Comment

Previous Post Next Post