रोहा (नंदकुमार कळमकर): पुगांव ग्रामपंचायती ग्रामसभा दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली... या ग्रामसभेत पुगांव दत्त मंदिर ते पुगांव गावापर्यंत कालव्याला लागलेली गळती थांबविण्यासाठी ठराव घेऊन तो सर्वान मते मंजूर करण्यात आला...
वरील विषयानुसार पुगांव ग्रामस्थांकडून मुख्य कार्यकारी अभियंता कोलाड पाटबंधारे खाते यांना निवेदन देऊन निवेदनात पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले,
1. दत्त मंदिर पुगांव ते पुगांव गावापर्यंत कालव्याला लागलेली गळती बंद करून शेतीचे होणारे नुकसान थांबवावे...
2 ज्या ठिकाणी फुटलेले सिमेंटचे पाईप आहेत ते बदलून त्यावर १५ x५० फुटाचे आर. सी. सी. चे बांधकाम करणे,
3 कालव्याच्या तळाला मोठे गुरूळ पडले त्या ठिकाणी सिमेंट काँक्रेटीकरण करणे आवश्यक आहे.
4 कालव्याच्या पश्चिमेकडील बाजूला पाणी मोठ्या प्रमाणात झाल्यावर झीरपते त्या ठिकाणी आर. सी. सी. बांधकाम करणे,
5 जुने गट नादुरुस्त आहेत त्यातून पाणी वाहते ते दुरुस्त करणे भातशेतीतुन जाणारी जुनी चरी साफ करणे आवश्यक आहे...
आपणामार्फत संबंधित कालव्याची दुरुस्ती होते परंतु एक दोन महिन्यात परिस्थिती जैसे थे अशीच आहे...यामुळे याकडे लक्ष देऊन कालव्याची गळती थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे...
