महाराष्ट्र वेदभुमी

सातीर्जे येथील रमेश म्हात्रे यांच्या अंगणात आलेल्या नागाला पकडून सर्पमित्र आसिफ मलिक यांनी दिले जीवदान


सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सातीर्जे येथील रमेश म्हात्रे यांच्या घराच्या अंगणात मंगळवार दि. ७ एप्रिल२०२६ रोजी भर दुपारी दोन वाजताच्या सुमारास भला मोठा आलेला नाग सर्पमित्र आसिफ मलिक यांनी सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले...

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातीर्जे येथील ज्येष्ठ नागरिक रमेश म्हात्रे यांच्या अंगणात भला मोठा नाग आल्याचे निदर्शनास आल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी ताबडतोब किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना सदरची माहिती देत सर्पमित्राला पाठवण्याची विनंती केली. पिंट्या गायकवाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चोंढी येथील सर्पमित्र असिफ मलिक यांना संपर्क साधून माहिती दिली. यावर सर्पमित्र असिफ मलिक यांनी त्वरित प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो साप हा नाग असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आपल्या कलाकौशल्याने नागाला पकडून कनकेश्वर येथील जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देत जीवदान दिले. याबद्दल सर्पमित्र आसिफ मलिक यांचे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी व त्यांच्या मित्रपरिवारांनी कौतुक करत आभार मानले आहे...         

    आसिफ मलिक हे गेली अनेक वर्षे चोंढी पंचक्रोशीत आढळलेल्या विविध प्रकारच्या अनेक विषारी व बिनविषारी सापांना पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे महान कार्य करीत आहेत... 

        यावेळी सर्पमित्र आसिफ मलिक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जंगलातील प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास मानवीय वृक्षतोड, वणवा लावणे आदी कारणांमुळे नष्ट झाला आहे. यामुळे जंगलातील माकडे, बिबट्या, सर्प व इतर वन्यजीव मानवी वस्ती कडे वळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच महत्वाचे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत सरपटणारे व इतर प्राणी खाद्याच्या शोधात व गारव्यासाठी डोंगराच्या खालील भागात येत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साप हे मुख्य घटक असल्याने चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्या सापांना न मारता मला पुढील नंबरवर 7887684678 नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे...

फोटो लाईन : सातीर्जे येथे सर्पमित्र असिफ मलिक हे नागाला पकडताना,

Post a Comment

Previous Post Next Post