अलिबाग (ओमकार नागावकर) : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या समर्थनार्थ अलिबाग शहरात महिलांची उत्साहपूर्ण पदयात्रा पार पडली... महिलांच्या सन्मान, हक्क आणि सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला...
या पदयात्रेत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. ॲड. पल्लवी तुळपुळे, ॲड. मनस्वी मोहिते, सौ. तनुजा पेरेकर यांच्यासह पेण नगराध्यक्ष सौ. प्रितम पाटील, सौ. शर्मिला पाटील तसेच प्रदेश संयोजिका सौ. मृणाल खेडकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले... याशिवाय इतर अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या...
पदयात्रे दरम्यान घोषणाबाजी व जनजागृतीच्या माध्यमातून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’चे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले... महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा, हा ठाम संदेश यावेळी देण्यात आला... या उपक्रमामुळे अलिबाग शहरात महिला सक्षमीकरणाचा मजबूत आवाज उमटला असून, ‘नारी शक्ती’ची एकजूट आणि ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झालीय...
