उरण (अजय शिवकर): नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेच्या निकालात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाले, उरण येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी हर्ष शेखर म्हात्रे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे....
हर्षने उरण तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, रायगड जिल्ह्यात १९ वी आणि महाराष्ट्र राज्यात २४ वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे... इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राज्य पातळीवर चमक दाखवल्याने शाळेच्या व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे...
या यशाचे श्रेय हर्षच्या पालकांनी मार्गदर्शक प्रशांत कोळी सर आणि चैताली म्हात्रे मॅडम यांना दिले आहे... "सर आणि मॅडम यांनी घेतलेली मेहनत, नियमित सराव आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले," अशी प्रतिक्रिया हर्षच्या पालकांनी दिली...
हर्षच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी त्याचे व दोन्ही मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत...
