महाराष्ट्र वेदभुमी

कैसे हराया रिलफेम "सहर शेखचे" नगरसेवक पद धोक्यात मुंब्रा


मुंबई प्रतिनीधी:(सतिश पाटील): ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ⁠⁠ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे... त्यामुळे आता सहर शेख हिचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे... नगरसेवक झाल्यानंतर केलेल्या भाषणावेळी सहर हिने कैसे हराया.. असे भाषणात म्हणाली अन् महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती... सहरचे रील अन् व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते... पण आता सहर शेख हिचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे.... 

सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात यावा अशीे शिफारसही करण्यात आली आहे... ⁠तहसीलदार उमेश पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली... ⁠उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पतडताळणी समितीकडे शिफारस केली...

⁠सहरचे वडील यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची करण्यात तक्रार केली होती... सहर हिच्या विरोधात ⁠सिद्दीकी अहमद या व्यक्तीने तक्रार केली होती... त्यावर चौकशी करण्यात आली. त्यात सहर दोषी असल्याचे आढळले आहे...

ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी चौकशी केली... त्यानंतर अहवाल तयार केला... सहर शेख मुळची उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील रहिवाशी आहे... ⁠जात पडताळणी विभाग, निवडणूक विभाग आणि ठाणे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय यांची फसवणूक केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे... सहर हिच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे... त्याशिवाय तिचे नगरसेवक पदही जाऊ शकते...

Post a Comment

Previous Post Next Post