महाराष्ट्र वेदभुमी

खांदाड परिसरातही विकासाला गती देण्यासाठी ज्ञानदेव पोवार यांचा पुढाकार...

अमृत योजनेच्या कामांची पाहणी

माणगाव:(नरेश पाटील):ग्रामीण भागात विकासाची भक्कम पायाभरणी करणारे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे ‘ग्रामीण विकास पुरुष’ म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव पोवार आता शहरी भागाकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देताना दिसत आहेत. रा.जि.प.चे सभापती असताना त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांची छाप उमटवली होती; त्याच धर्तीवर आता माणगाव शहरातील खांदाड परिसरातही विकासाला गती देण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत....

    केंद्र सरकारच्या 'अमृत योजना' अंतर्गत माणगाव शहरात सध्या जलपुरवठा प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू असून शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर खोदकाम व पाइपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. २५० मिमी व १४० मिमी व्यासाच्या मोठ्या पाइपलाईन्स टाकल्या जात असल्याने पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे...

 सध्या खांदाड वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ही कामे विशेष वेगाने सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणावर हालचाल दिसून येत आहे... यावेळी पोवार यांनी राजीप शाळेजवळील कामाची पाहणी केली. त्यांनी संबंधित पर्यवेक्षकांशी चर्चा करून प्रकल्पाची रूपरेषा, उद्दिष्टे व आराखड्याची सविस्तर माहिती घेतली...

       या पाहणी दरम्यान पोवार यांनी अंतर्गत रस्ते व मुख्य मार्गांमधून पाइपलाईन कशी टाकावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ चांगला दर्जाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या... काही ठिकाणी जुन्या जलवाहिन्या नुकसानग्रस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून काही घरांचा पाणीपुरवठा खंडित झाल्याचे निदर्शनास आले... याची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले...

  याशिवाय, राजीप शाळा परिसरातून मोर्बा रोड रस्त्याकडे नवीन पाइपलाईन टाकण्याबाबतही त्यांनी दिशा दर्शवली... यादरम्यान प्रकल्पांतर्गत सुमारे आठ उंच जलसाठा टाक्यांचे बांधकाम माणगाव शहरातील विविध ठिकाणी सुरू असून सुमारे ₹५५ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहे...

  'ग्रामीण विकास पुरुष’ म्हणून ओळख असलेले  पोवार आता शहरी विकासातही सक्रिय भूमिका बजावत आहेत. खांदाड येथील प्रसिद्ध सोनाभैरव मंदिर येथे ₹२ कोटींच्या भक्त निवास प्रकल्पाचे काम सुरू झाले असून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत... तसेच युवकांसाठी व्यायामशाळेचाही समावेश या प्रकल्पात करण्यात येणार आहे...

 यावेळी माध्यमांशी बोलताना पोवार यांनी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदार भरत शेट गोगावले यांचे विशेष कौतुक केले...या सर्व विकासकामांमुळे माणगाव शहराच्या अनेक ठिकाणी आणि विशेषतः खांदाड परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे... ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही विकासाची नवी दिशा देण्याचा पोवार यांचा प्रयत्न निश्चितच माणगावच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post