प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील निसर्गरम्य खिंडसी जलाशय परिसरात पर्यटनाला नवी उभारी देणाऱ्या ‘हॅप्पी हिल्स प्रकल्प’ या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले... हा प्रकल्प राजकमल टुरिस्ट कॉम्प्लेक्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून साकारण्यात आला असून, निसर्ग, पर्यटन आणि विकास यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम निश्चितच परिसरातील पर्यटनवाढीस चालना देईल... हा प्रकल्प निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीच्या अनुभव घेण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे... या प्रकल्पामुळे निसर्गरम्य खिंडसी जलाशय परिसरातील पर्यटनाला नवी उभारी मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले... यावेळी कार्यक्रमाला वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, रामटेक नगरपरिषदचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे, भाजप रामटेक शहराध्यक्ष रजत गजभिये, भाजप जिल्हा महामंत्री राहुल किरपान, राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) प्रदेश सरचिटणीस शिवराज बाबा गुजर, आलोक मानकर, सतीश डोंगरे, धर्मेंद्र शुक्ला, उमेश पटले, योगेश मात्रे, गौरव चौकसे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...
