अलिबाग : भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. पल्लवी सत्यजित तुळपुळे यांची नियुक्ती करण्यात आलीय... त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतोय... अलिबाग येथील रहिवासी असलेल्या ॲड. तुळपुळे यांच्यावर पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या वतीने त्यांना पुढील कार्यकाळात महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील महिलांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकासाच्या वाटचालीत अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले...
जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांना एकत्र आणत पक्षाची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबवून संघटन बळकट करण्यासाठी ॲड. पल्लवी तुळपुळे प्रामाणिकपणे कार्य करतील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय...
