महाराष्ट्र वेदभुमी

रायगडची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; वरिष्ठ पदे रिक्त, रुग्णसेवेवर गंभीर परिणाम

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत चिंताजनक बनलीय, महत्त्वाची वरिष्ठ पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.... यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होतोय... जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाणारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी ही महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत...  तात्पुरता या पदांचा अतिरिक्त कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने प्रशासनावर ताण वाढलाय....

सध्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार डॉ. निशीकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलाय तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी या दोन्ही पदांचा पदभार सहाय्यक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. प्राची नेहुलकर यांच्याकडे आहे... दरम्यान, नियमित जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र नियुक्ती झाल्यानंतरही त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही... तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन अद्याप रायगड जिल्ह्यातूनच दिले जात असल्याची माहिती समोर येत असून, या बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे...

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे निर्णयप्रक्रियेतील विलंब, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतोय.. . तात्पुरत्या पदभारामुळे प्रशासकीय कामकाजावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे... या पार्श्वभूमीवर, रिक्त पदांवर तत्काळ नियमित नियुक्त्या करणे, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करणे आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे... रायगडची आरोग्य व्यवस्था सध्या ‘आयसीयू’मध्ये असल्याची भावना व्यक्त होत असून, आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post