महाराष्ट्र वेदभुमी

महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा लाभ घ्या : तहसीलदार कोळपे


सर्व विभागाचे अधिकार-कर्मचारी राहाणार हजर 

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करणेसाठी मंडळ स्तरावर दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १) राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष अभियानाची सुरुवात नगरधन येथून ७ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार रमेश कोळपे यांनी केले आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांना गती देणे आणि महसूल विषयक कामकाजात सुलभता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे...

तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांना विविध कार्यालयांची पायपीट करण्याची गरज भासू नये, यासाठी ‘एकाच ठिकाणी-एकाच दिवशी’ सेवा देण्याची संकल्पना या मोहिमेतून प्रत्यक्षात आणली जाणार आहे. समाधान शिबीरामध्ये सीएससी सेंटर, आधार केंद्र, पांधन रस्ते, संजय गांधी निराधार, फेरफार, त्या भागातील घरकुल साठी रेती चे आदेश, विविध प्रकारचे दाखले तथा प्ररलंबित अर्जांचा पाठपुरावा तसेच महसूल संदर्भातील इतर प्रशासकीय बाबींचे तात्काळ निवारण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दि. ०७ मार्च  नगरधन मंडळ ( मोहित सभागृह ) येथे तर दि. १४ मार्च रोजी देवलापार मंडळ ग्रामपंचायत भवन, कट्टा येथे शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post