निवेदनातील प्रमुख मागण्या:
नागरिकांनी प्रशासनाकडे खालील पाच प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत:
मूलभूत सुविधा: भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, आधुनिक शौचालय आणि महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह (चेंजिंग रूम) तात्काळ उभारण्यात यावी...
बैठक व्यवस्था: नागरिकांना बसण्यासाठी सावलीत बाकड्यांची (बेंच) व्यवस्था करावी. तसेच फूल-प्रसाद विक्रेत्यांसाठी अधिकृत दुकानांचे गाळे उपलब्ध करून द्यावेत...
वाहतूक व्यवस्था: घाटावर होणारी अवैध पार्किंग रोखण्यासाठी प्रशस्त वाहन पार्किंग स्थळ विकसित करण्यात यावे...
सौंदर्यीकरण व प्रकाश व्यवस्था: नदी घाटाचे सौंदर्यीकरण करून पुरेसे स्ट्रीट लाईट्स आणि सोलर लाईट्स लावावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिक सुरक्षित राहतील...
महसूल उत्पन्नाची संधी: या सुविधांच्या देखभालीसाठी नगर परिषद नाममात्र 'युजर चार्ज' लागू करून उत्पन्न वाढवू शकते, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे...
पर्यावरण रक्षण आणि शहराची प्रतिष्ठा
"कन्हान नदी घाटाच्या सौंदर्यीकरणामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर जिल्ह्यामध्ये कन्हान शहराची प्रतिष्ठाही वाढेल," असा विश्वास प्रशांत मसार यांनी व्यक्त केला आहे... या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती समस्त जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे...
यावेळी रामटेक खासदार बर्वे तथा कन्हान नगरपरिषदेच्या विभागात हे निवेदन अधिकृतपणे स्वीकारण्यात आले असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... याप्रसंगी प्रशांत बाजीराव मसार, नितीन मेश्राम, उमेश यादव, गणेश भालेकर, अमोल वंजारी, आकाश बोरघरे शुभम मंदुरकर आदी उपस्थित...
