महाराष्ट्र वेदभुमी

जय हो बंद! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार

Mumbai Coastal Road:

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील): मुंबईमधील कोस्टल रोडवरती मुंबई महापालिकेने सुरु केलेला अनोख्या प्रकल्पामुळे  स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी होत्या. रस्त्यावरून गाडी गेल्यानंतर वाजणाऱ्या 'जय हो' या गाण्याच्या धूनमुळे लोकांना होणारा त्रास आता कमी होणार आहे.   

‘मेलोडी रोड’ प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी आवाजामुळे रहिवाशांच्या तक्रारी

मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी आला होता. या प्रकल्पाचं बाकीच्या लोकांकडून कौतुक झालं असलं तरी तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. पंरतु आता  मुंबई येथील कोस्टल रोडवर तयार करण्यात आलेल्या या म्युझिकल रस्त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने महापालिकेला तो तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचं रहिवाशांकडून स्वागत करण्यात आलं आहे. 

मेलोडी रोड’मुळे वाढला आवाजाचा त्रास

नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहनं ठराविक वेगाने गेली की ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येत होती. सुरुवातीला हा प्रयोग आकर्षक वाटला, पण हाच सततचा आवाज काही दिवसांतच डोकेदुखी ठरला. ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांनी विशेषतः सकाळी आणि रात्री होणाऱ्या आवाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. सततच्या ध्वनीमुळे घरात शांतता राहत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

रहिवाशांची तक्रार, महापालिकेची दखल

या भागातील सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, “खिडक्या उघडणंसुद्धा अवघड झालं आहे. सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे.” या वाढत्या विरोधामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हा ‘मेलोडी रोड’ सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय

महापालिकेच्या प्राथमिक तपासणीत आवाजाची पातळी नियमांमध्ये असल्याचं दिसून आलं असलं, तरी नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. आता तज्ञांकडून सविस्तर ध्वनी अभ्यास केला जाणार आहे. आता विशेषतः रात्रीच्या वेळेतील परिणाम तपासले जातील. भविष्यात हा रस्ता फक्त विकेंड किंवा विशेष प्रसंगी सुरू ठेवण्याचा पर्यायही विचारात घेतला जात आहे. 

परदेशात यश, मुंबईत आव्हान

‘मेलोडी रोड’ ही संकल्पना जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये यशस्वी ठरली आहे. मात्र, दाट लोकवस्ती आणि सततची वाहतूक असलेल्या मुंबईत असा प्रयोग राबवताना वेगळ्या अडचणी समोर येत असल्याचं स्पष्ट झालं.

प्रकल्पाची माहिती

11 फेब्रुवारी रोजी सुमारे 6 कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला होता.,आता रहिवाशांच्या विरोधानंतर हा प्रकल्प पुढे कशा स्वरूपात सुरू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे...

एकूणच, ‘मेलोडी रोड’ हा आकर्षक प्रयोग असला तरी नागरिकांच्या6नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर त्यात बदल करणे किती गरजेचे आहे, हे या प्रकरणातून दिसून येत आहे. याचा अर्थ अभ्यासपूर्ण प्रकल्प राबवून 6कोटी पाण्यात घालवले भुगतान जनतेच्या खिशातून केले जाणार...

Post a Comment

Previous Post Next Post