महाराष्ट्र वेदभुमी

टुयापार येथे ‘रेस्क्यू’ केलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

सेमिनरी हिल्समधील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सुरु होते उपचार 

शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचा खुलासा 

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:-देवलापार वनपरिक्षेत्रातील टुयापार गावातून बचाव करण्यात आलेल्या सुमारे एका वर्षाच्या बिबट्याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे वनविभागाच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या छाती व फुफ्फुसाला जबर मार लागल्याने झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे बिबट्याच्या मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. टूयापारमध्ये गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या टीमने रेस्क्यू करत सेमिनरी हिल्समधील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर येथे रात्री सुमारे १० वाजता उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाही पहाटे अंदाजे २ वाजता त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार, छाती व फुफ्फुसांमध्ये अंतर्गत अतिरक्तस्राव आढळून आला, असून गंभीर आघात झाल्याचे स्पष्ट झाले. एखाद्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे हा रक्तस्त्राव झाल्याच्या अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आणि अंतर्गत भागात जखम झाल्यामुळे उपचारादरम्यान बिबट्याच्या मृत्यू झाल्याची चर्चा आहे. रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या पथकाकडे कारवाईच्या वेळी आवश्यक बेशुद्धीकरण औषधे उपलब्ध नव्हती. नंतर पेंच येथून औषधे मागविण्यात आली मात्र ती कालबाह्य असल्याचा आरोप आहे. या घटनेत दिसून आलेल्या अपुऱ्या तयारीमुळे वन्यजीव आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यातील विभागाची कार्यक्षमता आणि तत्परता याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनला वेळ लागल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला असा आरोप ही वन्यजीव प्रेमींनी केला आहे.

वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याकडे पाठ फिरवली 

घटनेची माहिती मिळताच देवलापारचे वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले व त्या बीटचे वनरक्षक कोमल राऊत त्यांचे कर्चाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले रेस्क्यु टीम चार ते पाच तासांनी आरामात पोहचली परंतू वनविभाग प्रादेशीकचे कोणतेही वरीष्ठ अधिकारी शेवटपर्यत पोहचलेच नाही.त्यांना याबाबत कोनतीही गंभीरता दिसून आली नाही...

.तर बिबट्या वाचला असता

मनोज सांगोडे याचा मुलगा अर्नव याने दिलेल्या माहितीनुसार बिबट सकाळी १०.३० चे सुमारास गोठ्याच शिरला.त्यानंतर लगेच वनविभागाला कळविण्यात आले.याची माहिती ११.३० चे दरम्यान रेस्क्युटीमला देण्यात आली परंतू मानवाचीच नाही तर प्राण्यांची गंभीरती लक्षात न घेता टीम सायंकाळी ४ नंतर पोहचली जर दोन तासात आली असती व रेस्क्यु लवकर झाले असते तर त्या बिबट्यावर उपचार करतांना लक्षात आले असते व त्याचा जीव वाचला असता यावरून वनविभाग किती गंभीर आहे हे दिसून येते...

Post a Comment

Previous Post Next Post