महाराष्ट्र वेदभुमी

तलावात उडी घेऊन तरुणाने जीवन संपवले

 


प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक :- येथील सुभाष वार्ड मध्ये राहणाऱ्या रोशन बबनराव ढोके (वय २७) या तरुणाने गुरुवार (दि.१९) मार्चला सायंकाळी रामटेक-मानापूर  मार्गावरील असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशनला दारूचे व्यसन होते आणि तो घरातून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती... दरम्यान गुरुवार (दि.१९) मार्चला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रामटेक-मानापूर मार्गावरील राखी तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला... त्यांनी तत्काळ रामटेक पोलिसांना माहिती दिली... पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले... मृतदेह बेपत्ता रोशनचाच असल्याचे निष्पन्न झाले... शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही... पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे...

Post a Comment

Previous Post Next Post