महिला स्पर्धकांवर ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे विविध प्रकारच्या बक्षिसांचा अक्षरशः पाऊस,
सोगांव - अब्दुल सोगावकर : संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आज महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यामुळे यादिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात येतो. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळच्या सुमारास ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे महिलांसाठी होम मिनिस्टरसह इतर विविध प्रकारच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता...
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बचत गटांच्या अध्यक्षा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापंगांव चे सदस्य श्री क्लासेस चोंढीचे संस्थापक संतोष राऊत सर, जगदीश सावंत, वसीम कुर, अजित घरत, विजय भगत, स्नेहा रुत, प्रभाकर मोहिते, उत्तम राऊत, सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर, किफायत कुर, विश्वास थळे, सुमेश थळे, प्रमोद दळवी, राजेंद्र घरत, माजी मज्जीद कूर, दत्तात्रेय राऊत, दत्ताराम राऊत, मनीष म्हात्रे, मंगेश सुतार, प्रवीण पाटील, तेजस काठे, उत्तम राऊत, गितेश करळकर, संतोष रुत, शफी वाकनीस व मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील व मापगाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला व पुरुष ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते....
यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेक कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष जाहीर सन्मान व सत्कार करण्यात आला. यामध्ये अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल माहिती दिली... यावेळी डी. महेश व त्यांच्या कलाकारांनी महिलांच्या अनेक मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी प्रामुख्याने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत मयुरी संदेश थळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना रोख रक्कम १५,०००/ रुपये देण्यात आले तर निमा प्रविण पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना रोख रक्कम १०,०००/ रुपये देण्यात आले, तसेच अनन्या अल्पेश मल्हार यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांना रोख रक्कम ५,०००/रुपये देण्यात आले. यासोबतच संघवी हुमणे, रेणुका थळकर, चित्रा चापडे, राजश्री जाधव, कावेरी दळवी या सर्व महिलांना चतुर्थ क्रमांक विभागून प्रत्येकी रोख रक्कम ३,००० देण्यात आले...
या स्पर्धेत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सात गावांमधून प्रत्येक गावातील एक लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या महिला विशाखा पाशीलकर - मुशेत, नीता प्रफुल्ल राऊत - मापगाव, जन्नत समीर जमादार - सोगाव, संचिता सचिन कदम - मुनवली, कांता निवृत्ती वाघमारे - चोरोंडे, चैताली संजय चापडे - बहिरोळे, प्रज्ञा प्रणय घरत - बेलवली या विजेत्या महिलांना प्रत्येकी रोख रक्कम ५,०००/ रुपये देण्यात आले...
यामध्ये शेवटी 'मेगा लकी ड्रॉ' पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बहिरोळे येथील वैशाली धीरज घरत या महिलेला रोख रक्कम ५०,००० रुपये देण्यात आले. सर्व विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत पारितोषिके देण्यात आली. तर उपस्थित सर्व महिलांना ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. यावेळी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्या वतीने ऑर्केस्ट्रा कलाकारांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...
या कार्यक्रमाला सर्व थरांतील व सर्व समाजातील महिलांची उपस्थिती हि लक्षणीय होती... सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. क्लासेस चे संस्थापक संतोष राऊत सर यांनी केले, तसेच 'होम मिनिस्टर' हा संपूर्ण कार्यक्रम डि. महेश यांनी सूत्रसंचालित केला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव चे सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली...
फोटो लाईन : ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या 'मेगा लकी ड्रॉ' स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या वैशाली घरत यांना पारितोषिक देताना उपस्थित मान्यवर,

