महाराष्ट्र वेदभुमी

सुकेली खिंडीतील डोंगर वणव्यात होरपोळतोय,वनसंपदेची प्रचंड हानी, जैव विविधता धोक्यात.

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवसांपासून प्रचंड वनवे लागण्याचे सत्र सुरूच असुन सोमवारी सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास सुकेली खिंडीतील डोंगराला लागलेल्या  वणव्यामुळे डोंगर अक्षरशः होरपळून निघत असताना दिसत आहे.तर सततच्या वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत असून पशुपक्षी तसेच जैव विविधता धोक्यात आली आहे त्यामुळे प्राणी मात्रांच्या जीवावर गदा येत आहे... यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांचा जिव हे वणवे दिसल्याने तुटत आहे...   

माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनादीकाळापासून वृक्षाची अक्षरशः कत्तल केली आहे...सध्याच्या आधुनिकेतेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिकरण व नागरिकीकरणाच्या नावाखाली जंगलच्या जंगले भुईसपाट होतांना दिसत आहे...त्यामुळे अगोदरच पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे... त्यातच भरीत भर म्हणून ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या वणव्यामुळे यात अधिक भर पडत आहे...

दरवर्षी मार्च महिना सुरु झाल्यावर वनवे लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे... वनवे लावणाऱ्यांवर कोणाचा अंकुश नसल्यामुळे व कायद्याचा धोका नसल्याने त्यांचे फावत आहे... शिकार करणे, वृक्ष तोड करणे, वनसंपदा मिळवणे तसेच सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा याकरिता वनवे लावले जात असले तरी ते कायद्याच्या चौकटी बाहेरचे आहे... परंतु वनखाते याबाबत पूर्णपणे उदासिन दिसून येत आहे... कारण वनसंपदेची हानी करणाऱ्यांवर कधीही कारवाही झाल्याचे दिसून येत नाही...

रोहा तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेल्या मोजक्याच जंगलांमध्ये सुकेली जंगलाचा समावेश येतो तर हा डोंगर मुंबई-गोवा हायवे लागत असलेल्या विपुल वनसंपदेमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे सहज लक्ष वेधून घेत आहेत... त्यामुळे वनसंपदेबरोबच प्राण्यांच्या वास्तव्यावर गदा येतांना दिसत आहे... ऐवढे सगळे होत असतांना वनखाते मात्र याबाबत पूर्णपणे निद्रास्त दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post