तहसीलदार उद्धव कदम यांचे नागरिकांना आवाहन.
पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे): हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्याचा महसूल विभाग मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे... छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान पुढील ३ महिन्यात दिनांक ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, ८ मे, १५ मे या दिवशी सर्व मंडळ, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रात ६ विशेष अभियान दिवस आयोजीत करण्यात येणार आहे... सर्व सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिलांसाठी महसूल विभागाच्या १५ सेवा देण्यात येणार आहेत... या योजनेचा लाभ समाजातील सर्वच घटकांनी, जनतेनी, नागरिकांनी घ्यावे असे आवाहन पत्रकार परिषदेत उरण चे तहसीलदार उद्धव कदम यांनी केले आहे...
शासनाच्या महाराजस्व अभियान बद्दल माहिती देण्यासाठी व ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने उरण तहसील कार्यालयात दि ५ मार्च २०२६ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते... यावेळी तहसीलदार उद्धव कदम यांनी महाराजस्व अभियान बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले कि माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, अपंगापासून अनाथापर्यंत, विधवेपासून वृद्धेपर्यंत आणि शेतकऱ्यापासून उद्योगपती पर्यंत महसूल विभागाचा पालक विभाग म्हणून संबंध येतो. कामाची आणि नियमांची प्रचंड व्याप्ती यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळा मर्यादित कालावधीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत किंवा त्यांची कामे होत नाहीत हे लक्षात घेता महाराष्ट्र शासन आणि राज्याचे माननीय महसूल मंत्री ना. श्री. बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व तालुका स्तरांवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिरे घेऊन शासनाने आत्तापर्यंत जनतेच्या सुविधेसाठी जे शासन निर्णय आणले याचा प्रसार आणि प्रसिद्धी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना सातबारा, दाखले आणि इतर सुविधा त्यांचे द्वारी त्यांचे गावात उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने पुढील तीन महिन्यांमध्ये ग्रामस्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांचा समन्वय राहावा याकरिता, त्याकरिता तालुक्यात बैठकीमध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी, सरपंच, मंडळ अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. सदर अभियान हे दि. १८/०२/२०२६ ते दि. ०५/०३/२०२६ पर्वत मंडळ स्तरावरती पुर्व तयारी करणे व मार्च महिन्यात ७/०३/२०२६ ते दि. १४/०३/२०२६ दरम्यान मंडळ स्तरवरती चाणजे व जासई येथे होणार आहे. माहे एप्रिल महिन्यात कोप्रोली व वश्वी येथे, तसेच नगर परिषद शहरी भागामध्ये माहे मे मध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण ६ शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराचे तपशील पुढील प्रमाणे आहे.
शिबीराचे दिनांक,सजा गाव, ठिकाण :-
१)दि ७/३/२०२६ रोजी
उरण मंडळ मधील चाणजे सजामध्ये ग्रामपंचायत कार्यालय चाणजे
२)दि. १४/३/२०२६ रोजी मंडळ जासई मधील जासई गावामध्ये लोकनेते दिबा पाटील सभागृह जासई
३) दि १०/४/२०२६ रोजी मंडळ कोप्रोली मधील कोप्रोली गावामध्ये रा.जि.प. शाळा कोप्रोली
४) दि १७/४/२०२६ रोजी जासई मंडळ मधील वेश्वी सजामध्ये हनुमान मंदिर वेश्वि
५)दि. ८/५/२०२६ रोजी उरण मंडळ मधील उरण सजामध्ये उरण एज्युकेशन सोसायटी उरण
६)दि. १५/५/२०२६ रोजी उरण मंडळ मधील उरण सजेतील म्हातवली गावामध्ये उरण एज्युकेशन सोसायटी उरण
