महाराष्ट्र वेदभुमी

मुठवली गावचे तुरेवाले शाहीर चंदू कापसे यांचे निधन.

 

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील मुठवली बुद्रुक येथील तुरे नाच मंडळाचे नामवंत शाहीर चंदू महादेव कापसे यांची वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या जाण्याने कापसे परिवारावर दुःखाचे डोंगर तर मुठवळी गावावर तसेच परिसरात शोककळा पसरली असून नाच मंडळात त्यांच्या कलेची पोकळी निर्माण झाली आहे...

सुरवातीच्या काळात आपली वडिलोपार्जित शेती व्यवसाय करत ते मुंबई येथील सूत गिरणीत काम करत होते मुंबईत चाकरी करत असताना त्यांना नाच गाणे कलेतून शाहिरीरूपी गाण्याची आवड निर्माण झाली आणि मुंबईची कला गावकडे रुजवत त्यांनी नाच मंडळ तुरे ताडदेव घराण्याचा वारसा जपत तालुक्यातील वैजनाथ येथे नाच मंडळ शाखा स्थापन करून मुंबई येथील रंगमंचावर कला सादर करत नावलौकिक केले... गावच्या नाच मंडळात आपले योगदान देत गावचे नाव कलेतून शाहिरीरूपी उंचावले... वडिलोपार्जित शेती, सामाजिक कार्य, अंगी असलेली कला कौशल्य या कलेतून असंख्ये रसिक प्रेक्षकांची मने चंदू कापसे यांनी जिंकली रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यात त्याच बरोबर कोकण मुंबई ठाणे आदी ठिकाणी त्या काळात कलगी तुरा आदी नाचांची जुगल बंदी होत असल्याने त्यावर आपली धडाकेबाज आणि कणखर आवाजात आपल्या बोलीभाषेत काव्य रचना आणि त्यावर शाहिरीतील टोमणे आणि स्वतः तयार केलेले गाणे विविध गाण्यांच्या तालावर तसेच सुरावर गाण्याचे काम आपल्या कलेतून करत नाच मंडळासाठी केले आणि तळागाळातील ग्रामीण भागातील शक्ती तुरा नाच मंडळ मुंबई तसेच शहरी भागात या नाच मंडळाना संधी मिळाली आणि नावलौकिक केले...

तुरे नाच मंडळाची कला जोपासणारे चंदू कापसे यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या अंत विधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा सांस्कृतिक आरोग्य, राजकीय क्षेत्रातील असंख्ये मित्र परिवार, नातलग उपस्थित त्यांच्या बद्दल रायगड सांस्कृतिक नाच मंडळ अध्यक्ष सुरेश दादा महाबळे, गायक तथा उत्कृष्ट ढोलकी वादक मंगेश बिरगावले सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांच्या दुःखाबाबत शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कापसे यांच्या पच्छात त्यांची पत्नी, तीन मुले, एक भाऊ , सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा कापसे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी रविवारी ८ मार्च रोजी व उत्तरकार्य तेरावे बुधवारी ११ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे मुठवली येथे संपन्न होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post