महाराष्ट्र वेदभुमी

एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे-रसायनी येथे "बॉम्ब स्कॉड मॉक ड्रिल" संपन्न..!

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण: पनवेल तालुक्यातील ॲडिशनल पाताळगंगा एमआयडीसी मधील एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे रसायनी येथे "बॉम्ब स्कॉड मॉक ड्रिल" संपन्न झाला. एचपीसीएल बॉटलिंग प्लांट चावणे-रसायनी मध्ये हा अतिशय ज्वलनशील गॅस सिलेंडर मध्ये भरला जातो त्याच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने कंपनीमध्ये अशा प्रकारच्या मॉक ड्रिल"वारंवार घेणे गरजेचं असतं याचाच एक भाग म्हणून दिनांक 24/03/2026 रोजी "बॉम्ब स्कॉड मॉक ड्रिल"घेण्यात आला... यावेळी बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस टीम)अलिबाग रायगड चे RSI स्वप्नील सावंत साहेब(राखीव पोलिस निरीक्षक), ASI धर्मेंद्र साटोटे साहेब(सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), HC/2347 अनुपम पाटील(पोलिस हवालदार), PN/2339 केशव पालवे( पोलिस नाईक), PN/1845 संदेश बलकवडे, PC/390 शैलेश गोतावडे, GPSH पाटील (चालक), PC/1551 ज्ञानेश्वर पालवे (चालक) व रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI अभिजीत भुजबळ साहेब, हवालदार हेमंत कोकाटे, LHC/352 नेहा जाधव, PC/419 रवींद्र कुंभार, LPC/63 रूपाली शिंदे, HC/2347 ए डी पाटील, प्रिया झावरे(पोलिस शिपाई), फिरोज ए डी(PM BPCL), डॉक्टर पद्माकर मते आदी मान्यवर आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते... बीडीडीएस टीम अलिबाग यांनी बॉम्ब कसा निकामी करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवून यशस्वी रीतीने संपन्न झाला... प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे ड्रिल कंपनीत घेतले जातात... नागरिकांची सुरक्षा कामगारांचे सुरक्षा व कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची खबरदारी म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची प्रात्यक्षिके कंपनीत वारंवार घेतली जातात... या कार्यक्रमाचे आयोजन चिफ प्लांट मॅनेजर कुंदन कुमार सर व सेफ्टी ऑफिसर अंकित कुमार गुप्ता यांनी केले होते. इतर स्टाफचेही सहकार्य लाभले...

Post a Comment

Previous Post Next Post