राम नामाच्या संगीत भजनात भक्त तल्लीन.
पुगाव खांब (नंदकुमार कळमकर): समस्त हिंदूचे आराध्य दैवत असलेले भगवान प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव तसेच श्री साईनाथ महाराज यांचा सव्वीसवे मंदिर वर्धापनदिन रोहा तालुक्यातील मुठवली बुद्रुक येथे गुरुवारी २६ मार्च रोजी श्री राम जन्मोत्सवानिमित्ताने मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला...
मुठवली गावचे सुपुत्र तथा मराठी कापड उद्योगजक रामशेठ कापसे यांच्या निवासस्थानी हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे अविरतपणे चालत असलेला हा प्रभू श्री रामनवमी आणि श्री साईनाथ महाराज मंदिर वर्धापनदिन उत्सव सोहळा यंदाही मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी या निमित्ताने श्री साईनाथ महाराज यांच्या मूर्तीवर जलाभिषेक पूजन महाआरती अन्न प्रसाद भजन हरी जागर असे धार्मिक हरी जागर भजन तथा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते...
सकाळी श्री साईनाथ महाराज मूर्तीची विधिवत पद्धतीने धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले तद्नंतर सदरच्या कार्यक्रमप्रसंगी सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत रोहा तालुक्यातील नामवंत सरस्वती भजन मंडळ रोहा यांचे संगीत भजनाचे व्यवस्थापक मारुती बुवा देशमुख, सुनील महाराज शेळके महाराज, वसंत माने, वाद्य मृदुंगमणि अनंत बुवा शिंदे आणि त्यांची मंडळी यांनी श्री राम नामाच्या आणि श्री साईनाथ महाराजांच्या समधुर आवाजात संगीयाच्या भजनात सारेच लीन झाले...
गावचे सुपुत्र राम सखाराम कापसे खरे राम भक्त साई भक्त रामशेठ कापसे यांना खरी राम भक्तीची प्रचित आल्याने गेली अनेक वर्ष ते हा उत्सव सोहळा मोठ्या भक्तीने भावाने आणि आनंदाने गेली पंचवीस वर्षे अविरतपणे साजरा करतात...
या निमित्ताने प्रसंगी सदरच्या कार्यक्रमाला युवा नेते तथा गोवे ग्राम पंचायत सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे, नरेंद्र शेठ जाधव, कोलाड पोलिस निरीक्षक भारत फराने,प्रमोद लोखंडे, मयूर कापसे,बबन म्हसकर, प्रमोद लोखंडे, गणेश म्हसकर, अजय कापसे, लहू पिंपळकर, यांनी श्री साईनाथ महाराज यांचे दर्शन घेत कापसे परिवारांना शुभेच्छा दिल्या...
तसेच रामशेठ कापसे, सौ रत्नप्रभा राम कापसे, त्यांचे चिरंजीव साईनाथ, हरेश, स्वरूप, सुनबाई सोनाली, सुप्रिया, नूतन, तसेच नातवंडे आणि कापसे परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ तसेच महिला आणि गावदेवी मित्र मंडळ मुठवली यांनी अथक परिश्रम घेतले...
