महाराष्ट्र वेदभुमी

तर यावर्षी गव्हाचे भरघोस उत्पादन होईल - सभापती किरपान


वादळी वाऱ्याची शेतकर्‍यांना भिती

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक :- सध्या जिकडे तिकडे गहु पिकाचे भरघोस असे पिक शेतात उभे असुन त्यांच्या लोंब्या पहाण्याजोगे आहे... तातुक्यातील शेतीवर नजर टाकल्यास जिकडे-तिकडे शेतात गहू पीक डोलतांना दिसत आहे. शेतकर्‍यांचा फायदा होईल. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात सुद्धा भर पडेल... मात्र दोन तिन दिवसांपासुन वातावरणात बदल झाल्यामुळे ह्या बदलामुळे कास्तकारांची चिंता वाढवणार आहे... निसर्गाने धोका न दिल्यास यंदा गव्हाचे चांगले पीक कास्तकारांचा पदरात पडेल, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांनी तातुक्यात गहू पिकाची पाहणीनंतर महाराष्ट्र वेदभूमीशी बोलतांना व्यक्त केले आहे... गेल्या चार ते पाच वर्षात झाले नसेल एवढे उत्पादन गहु पिकाचे यावर्षी होवु शकते असेही किरपान म्हणाले... मात्र गेल्या दोन-तिन दिवसांपासुन वातावरणात झालेला बदल तो शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे... भर उन्हाळ्याच्या प्रारंभी पावसाळ्यातील वातावरणासारखी झालेली ही परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी फारच चिंताजनक आहे. थोडा थोडा पाऊस आला तर चालेल पण वादळी वारा येऊ नये अन्यथा गहु पिकाचे प्रचंड नुकसान करेल... ही शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठी चिंतेची बाब राहील असेही सभापती सचिन किरपान म्हणाले....

तालुक्यात ११ हजार हेक्टरमध्ये लागवड 

कास्तकारांनी ११ हजार हेक्टरमध्ये गहु पिकाची लागवड केलेली आहे. भरघोस प्रमाणात लोंब्या आलेल्या आहे... गहु पिकाची लागवड उशीरा करण्यात आल्याने सध्या पिक कापणीवर आलेले नाही... सध्या कुठेही पिकाचे नुकसान झाले नसल्याची माहिती स्थानिक कृषी कार्यालयातुन प्राप्त झालेली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post