कोलाड (श्याम लोखंडे) वारकरी संप्रदायी परंपरा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह रोहा तालुक्यातील चिल्हे ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरा होत असल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताहात जणू भक्तीचा गजर उसळला असल्याने खांब पंचक्रोशी भक्तिमय झाली असून धाकटी पंढरी अवतरली आहे.भक्तीच्या रसात तल्लीन होऊन याचा आनंद लुटत आहेत...
कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान वै.सद्गुरू गुरुवर्य गणपत बाबा गुडेकर (अलिबागकर) महाराज, वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, वै.गुरुवर्य धोंडू बाबा कोलाटकर, यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच संत परंपरा लाभलेल्या खांब पंचक्रोशीत श्री तीर्थक्षेत्र चिल्हे येथे नारायणदादा अलिबागकर वाजे मठाधिपती पंढरपूर,दत्तू महाराज कोलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खांब पंचक्रोशीचे वैभव विद्या वाचस्पती रायगड भूषण डॉ.मारुती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात भक्त हरिनामात लीन होत असताना दिसत आहेत, ज्यामुळे परिसरात पंढरपूरसारखे भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याने जणू धाकटी पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे...
खांब पंचक्रोशीचे मूळ मार्गदर्शक वै.नारायणदादा माने, मोरेश्वर मामा मांगुलकर,नारायण दादा लोखंडे, सदाशिव वरखले, काशिराम बाबा गोसावी यांच्या अथक परिश्रमातून या पंचक्रोशीला एक आध्यात्मिक विचारांची भक्तीची प्रेरणा मिळाली अथवा अविरतपणे आजच्या पिढीला मिळत आहे...
परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर,भगवानगड येथील महंत न्यायाचार्य हभप डॉ.नामदेव महाराज शास्त्री, वेदांतचार्य महंत विवेकानंद शास्त्री अशा थोर साधू संतांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन लाभलेल्या या खांब पंचक्रोशीत आजच्या युगातील युवा पिढी धार्मिक तथा आध्यात्मिक विचारांच्या पावलावर पाऊल टाकत आहोत...
९ मार्च ते १६ मार्च दरम्यान साजरा होत असलेल्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तनरुपी सेवा लाभत असून नारायणदादा महाराज अलिबागकर वाजे, भरत महाराज अलिबागकर वाजे, रामदास महाराज टोंगले, रामदास महाराज खानवकर, तुकाराम महाराज शिंदे, आदी किर्तन कार यांची सेवा पार पडली असून विनायक महाराज कांबेकर, विशाल महाराज खोले, जगन्नाथ महाराज पाटील, यांच्या किर्तन सेवेचा लाभ देखील पुढे भाविकांना लाभणार आहे...
श्री संत सेवा मंडळ पंचक्रोशी खांब आयोजित यजमान चिल्हे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपन्न करण्यात येत असलेले अखंड हरिनाम सप्ताह येथील युवक युवती, ग्रामस्थ आणि महिला मंडळ तसेच विशेषतः माहेरवाशीण यांचा मोठा सहभाग असल्याने याठिकाणी भक्तिरसात लीन होऊन येथील युवक, युवती यांनी या ठिकाणी आकर्षक म्हणून ऐतिहासिक शिवकालीन पावनखिंड , संत परंपरा काळातील झोपडी, तसेच भाविकांना विविध आकर्षणाचे देखाव्यांची उभारणी केली असून मंदिर परिसरात विद्युत्त रोषणाई, घरोघरी गुढी उभारण्यात आली, कणा रांगोळी, फुलांची सजावट,तसेच भव्य दिव्य स्वरूपात मंडप आणि कीर्तनकार महाराज यांच्या सेवेसाठी तरुणाई एकटली झाली असून विविध दररोज विविध वेशभूषेत परिधान करून येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत...
सदरच्या आयोजित करण्यात येत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस चालणारा भक्ती कार्यक्रम साजरा होत आहे, ज्यात सकाळी काकडा आरती श्री संत ज्ञानेश्वरी गाथा पारायण, श्री संत जगतकीर्तन, पारायण आणि संपूर्ण हरिपाठ समावेश असतो.चिल्हे गावात महाराष्ट्रातील संत परंपरेचा उत्सव साजरा झाल्याने स्थानिक भक्ती वाढली.भक्तीचे महत्त्व प्राप्त होत आहे या भक्तीचे सामर्थ्य आणि विठ्ठलनामाचा राम नामाचा जयघोष दिसतो, ज्यामुळे पंचक्रोशी भक्तीने न्हाऊन गेली आहे...

